Development Fund | मोदी सरकारकडून राज्यांना निधी वाटप; महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव..?

0
40
Development Fund
Development Fund

Development Fund |  देशात नव्याने स्थापन झालेल्या मोदी ३.० ‘एनडीए’ सरकारने (NDA Govt) विकास निधीचा हप्ता मंजूर केला असून, यात राज्यांना भरघोस निधी देण्यात आला आहे. तर, या हप्ता वाटपात सर्वाधिक २५ हजार कोटींचा निधी हा उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) देण्यात आला आहे. तर, देशात सरकार स्थापनेत किंगमेकर ठरलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या बिहारला (Bihar News) १४ हजार कोटींचा देण्यात आलेला आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवार रोजी अर्थमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर सर्व राज्यांना विकास निधी (Development Fund) वाटप करण्यात आला. दरम्यान, या सर्व राज्यांसाठी तब्बल १ लाख ३९ हजार ७५० कोटींचा निधी देण्यात आला. मात्र, जीएसटी संकलनात आणि इतर कर देण्यात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा असूनही निधी देताना महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव करण्यात आल्याचे दिसत आहे.

Narendra Modi oath taking ceremony | केंद्रीय मंत्रीपदासाठी राज्यातील ‘या’ खासदाराचे नाव निश्चित

Development Fund | महाराष्ट्राला किती निधी? 

महाराष्ट्रात भाजप प्राणित महायुती सरकार असल्यामुळे महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, येथेही महाराष्ट्राचा हिरमोड झाला असून, महाराष्ट्राला ८ हजार ८२८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने तिथे केवळ ५ हजार ०९६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

सर्व राज्यांना अर्थ मंत्रालयाकडून वेगवेगळ्या स्वरूपात रक्कम देण्यात आली असून, अर्थ मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार उत्तर सर्वाधिक २५ हजार ०६९ कोटी. तर, १४ हजार ०५६ कोटींचा निधी मिळवत बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून, मध्य प्रदेश राज्याला १० हजार ९७० कोटी इतका निधी देण्यात आला आहे. (Development Fund)

NDA Cabinet Ministers List | मंत्रिपदासाठी ‘या’ खासदारांना फोन; राज्यात कोणाची रिंग वाजली..?

कोणत्या राज्याला किती निधी..?

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) 5655.72 कोटी रुपये
अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) 2455.44 कोटी रुपये
आसाम (Assam) 4371.38 कोटी रुपये
बिहार (Bihar) 14056.12 कोटी रुपये
छत्तीसगढ (Chhattisgarh) 4761.30 कोटी रुपये
गोवा (Goa) 539.42 कोटी रुपये
गुजरात (Gujarat) 4860.56 कोटी रुपये
हरियाणा (Haryana) 1527.48 कोटी रुपये
हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) 1159.92 कोटी रुपये
झारखंड (Jharkhand) 4621.58 कोटी रुपये
कर्नाटक (Karnataka) 5096.72 कोटी रुपये
 केरळ (Kerala) 2690.20 कोटी रुपये
 मध्य प्रदेश (Madhya Pradesh) 10970.44 कोटी रुपये
 महाराष्ट्र (Maharashtra) 8828.08 कोटी रुपये
मणिपूर (Manipur) 1000.60 कोटी रुपये
 मेघालय (Meghalaya) 1071.90 कोटी रुपये
 मिझोराम (Mizoram) 698.78 कोटी रुपये
 नागालँड (Nagaland) 795.20 कोटी रुपये
 ओदिशा (Odisha) 6327.92 कोटी रुपये
 पंजाब (Punjab) 2525.32 कोटी रुपये
राजस्थान (Rajasthan) 8421.38 कोटी रुपये
सिक्कीम (Sikkim) 542.22 कोटी रुपये
 तामिळनाडू (Tamil Nadu) 5700.44 कोटी रुपये
 तेलंगणा (Telangana) 2937.58 कोटी रुपये
 त्रिपुरा (Tripura) 989.44 कोटी रुपये
 उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) 25069.88 कोटी रुपये
 उत्तराखंड (Uttarakhand) 1562.44 कोटी रुपये
 पश्चिम बंगाल (West Bengal) 10513.46 कोटी रुपये
 एकूण निधी  139750.92 कोटी रुपये

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here