Lok Sabha 2024 | एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे ‘हे’ खासदार केंद्रात मंत्री होणार..?

0
38
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024

Lok Sabha 2024 |  बहुप्रतीक्षित अशा लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर झाला असून, यात भाजपचा 400 पार चा नारा आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न जरी भंगले असले. तरीही भाजपकडे बहुमत असून, काल चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांनीही भाजपला पाठिंब्याचे पत्र दिल्याने आता 8 जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपप्रणित एनडीए (NDA) आघाडी हे आता तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन करण्यासाठीची तयारी करत असून, शपथविधीची तयारीही सुरू झाली आहे. एनडीएत एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Eknath Shinde Shivsena) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीही(Ajit Pawar NCP) सहभागी असून, यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाला १ केंद्रीय मंत्रीपद आणि १ राज्यमंत्रीपद असे दोन तर शिंदे गटाला २ राज्यमंत्री आणि १ केंद्रीय मंत्रिपद असे तीन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर,या केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असणाऱ्या नेत्यांची नावेही समोर आली आहे.

PM Narendra Modi | मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; ‘या’ तारखेला होणार शपथविधी..?

Lok Sabha 2024 | या खासदारांची वर्णी लागणार..?

अधिक माहितीनुसार, शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे, बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मंत्रिपदासाठी तर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांची राज्यमंत्रिपदासाठी नावे चर्चेत आली आहेत. तर अजित पवार गटाकडून एकमेव लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, आदिती तटकरे यांची नावं समोर अलायी आहेत. दरम्यान, मंत्रिपदाची संधी यापैकी कोणाला मिळणार? हे पहावे लागणार आहे. (Lok Sabha 2024)

Devendra Fadnavis | फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद..?; राज्यात भाजपा नेतृत्वात फेरबदल होण्याची शक्यता

‘या’ तारखेला मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ..?

अजित पवार गट, शिंदे गट यांसह देशभरातील एनडीएत सामील असलेल्या घटकपक्षांनी भाजपला समर्थन पत्र दिले असून, त्यानंतर भाजपने राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापन करण्याचा आणि बहुमताचा दावा केला आहे. तर, समोर आलेल्या माहितीनुसार येत्या ८ जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर, काल जरी अजित पवार एनडीएच्या बैठकीला उपस्थित नसले तरी ७ आणि ८  तारखेला होणाऱ्या दिल्लीत एनडीएच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार आहेत.(Lok Sabha 2024)

दरम्यान, दिल्लीत होणाऱ्या मोदी यांच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू असून, या शपथविधीसाठी इतर देशांतीलदेखेळ महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. तर, पंतप्रधानांसोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही ८ जूनलाच शपथ घेण्याची महिती आहे. 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here