Dhule Lok Sabha | बाहेरच्या उमेदवार शोभा बच्छाव विजयी; भामरेंची हॅट्रिक हुकली

0
23
Dhule Lok Sabha
Dhule Lok Sabha

Dhule Lok Sabha |  धुळे लोकसभा मतदार संघात भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा संधी दिली. तर, कॉंग्रेसने शोभा बच्छाव यांना संधी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शविला. तर, शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. तर, त्यांच्यावर बाहेरच्या उमेदवार असल्याच्या टिकाही करण्यात आल्या. दरम्यान, धुळे हा गेल्या कित्येक वर्षांपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, मागील दोन टर्मपासून हा गड भाजपच्या सुभाष भामरे हे निवडणून आले होते.

Lok Sabha Election Result | विजयी उमेदवारांची यादी; महायुतीला ओवर कॉन्फिडन्स नडला..?

Dhule Lok Sabha | योगी आदित्यनाथ यांचीही सभा

तर, भामरे यांच्या या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता. तरी भामरे यांच्यासाठी भाजपने मतदार संघात आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. मालेगावमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांची सभादेखील झाली होती. हिंदुत्ववाडी मतं आपल्याकडे खेचण्यासाठी ही भाजपची रणनीती होती. मात्र, त्यांची ही रणनीती फेल ठरल्याचे दिसत असून, अखेर धुळ्यात सत्तापरिवर्तन झाले असून, धुळ्यात शोभा बच्छाव (shobha bachchhav) यांचा विजय झाला आहे. त्यामुळे हा गड परत मिळवण्यात कॉंग्रेसला मोठे यश आले आहे. (Dhule Lok Sabha)

Dindori Lok Sabha Election | प्लॅन सक्सेसफूल..?; दिंडोरीत ड्यूप्लिकेट भगरे सरांचीच हवा, लाखाकडे कूच


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here