Gold Silver Price 22 May 2024 | या वर्षाच्या सुरुवातीला असलेले सोन्याचे दर आणि आताचे दर यात मोठी तफावत बघायला मिळत आहे. या ५ महिन्यात सोन्याने मोठी झेप घेतली आहे. तर, चांदीनेही जवळपास लाखाकडे कूच केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाही सोनेच्या दरांमध्ये नरमाई होती. मात्र, या १० तारखेपासून किंमतींनी दरवाढीचे सत्र सुरू केले. या पंधरा दिवसातच किंमतीत जोरदार वाढ झाली. आता सोने ७५ हजारांच्या घरात आहे. तर, चांदीने लाखाकडे कूच केली आहे. आज असे आहेत सोने आणि चांदीचे दर…(Gold Silver Price 22 May 2024)
सोन्यात घसरण थांबली…
गेल्या महिन्यापासून सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून, गेल्या आठवडाभरातच सोने तब्बल २ हजारांनी महागले. तर त्यात ७७० रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात सोने ७५ हजारांवर पोहोचले आहे. २० मे सोने ५०० रुपयांनी महागले. तर २१ मे रोजी ६५० रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम ७४,६६० तर, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम ६८,४५० रुपये असे आहेत. (Gold Silver Price 22 May 2024)
Gold Silver Price 21 May 2024 | चांदीची लाखाकडे कूच; असे आहेत आजचे सोने चांदीचे दर
Gold Silver Price 22 May 2024 | चांदी स्वस्त
गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात ७,००० रुपयांची वाढ झाली. तर ५०० रुपयांची घसरण झाली. १८ मे रोजी किंमती ३,९०० रुपयांनी वाढल्या. तर २० मे रोजी चांदीत ३,५०० रुपयांची वाढ झाली आणि २१ मे रोजी किंमतीत पुन्हा १९०० रुपयांनी घसरली. आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव हा ९४,६०० रुपये असा आहे.
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७४,२१४ रुपये,
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७३,९१७ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६७,९८० रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५५,६६१ रुपये,
१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४३,४१५ रुपये असा आहे.
तर, एक किलो चांदीचा भाव हा ९२,८७३ रुपये असा आहे. (Gold Silver Price 22 May 2024)
(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)
Gold Silver Price 16 May 2024 | सोने चांदीतील घसरण थांबली; आज असे आहेत दर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम