Sanjay Raut | चक्की पिसिंग म्हणणाऱ्यांचंच किसिंग करताय..?; राऊत ‘मोदीराज’वर बरसले

0
71
Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई :  पाचवा टप्पा हा राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा असणार आहे. यासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार असून, उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभमीवर आज दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असून, शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत महायुतीची तर, बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सांगता सभा आज होणार आहे.

यासाठी दोन्ही गटांकडून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. महायुतीच्या या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. यावरून संजय राऊतांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

“जे तुम्हाला महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं म्हटलं होते. आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसतात, असे  म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंच्या या सभेवर टीका केली. तसेच अजित पवार यांनाही तुम्ही तुरुंगात टाकणार होता..? चक्की पिसिंग अँड पिसिंग म्हणजे आणि आता चक्की पिसिंगच्या ऐवजी किसिंग करताय, असा मिश्किल टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

Sanjay Raut | नाशिक महापालिकेत मोठा गैरव्यवहार..?; थेट मुख्यमंत्र्यांना लाभ..?

Sanjay Raut | पिसिंगच्या ऐवजी किसिंग करताय 

अजित पवार यांनाही तुम्ही तुरुंगात टाकणार होते. चक्की पिसिंग अँड पिसिंग म्हणाले होते. आणि आता चक्की  पिसिंगऐवजी किसिंग करताय, यावर तुम्ही बोला. आपल्या बंगल्यावरती सतत कोणाचा वावर सुरू आहे आणि कोण कोण होतं यात मला काही पडायचे नाही. आपण सामाजिक जीवनात वावरत असतो. त्यामुळे गर्दीत काही लोकं येतात आणि फोटो काढतात, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांचे दुकान दुकान बंद होणार

“या  निवडणुकीनंतर सुपारीची राज्यातील काही दुकाने ही बंद होणार आहेत. त्यात राज ठाकरे यांचेही हे एक दुकान आहे. तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स हे आता लवकरच बंद होणार आहेत. आता महाराष्ट्रात कोणीही येऊ देत. ते जितक्या सभा घेतील तितकीच वाट लागेल.

ज्यांनी शिव्या घातल्या त्यांना मांडीवर घ्यावे लागले नसते

“प्रधानमंत्री स्वतः मुंबईत येऊन इतक्या सभा घेत आहेत. म्हणजे तुम्ही दहा वर्षात काहीही केलेलं नाही. म्हणून ते येत आहेत. नाहीतर, ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या. तुम्हाला मांडीवर घेऊन बसावे लागले नसते. राज ठाकरे हे ज्यांच्यावर सवाल उठवतात. ते त्यांच्याचबरोबर जातात ही त्यांची खासीयत”.

Sanjay Raut | मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले.!; मुख्यमंत्र्यांच्या गार्डसच्या हातात पैशांच्या बॅगा..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here