Sharad Pawar | वादळी वाऱ्यात शरद पवारांची सटाणा येथे सभा; मोठी दुर्घटना टळली

0
57
Sharad Pawar
Sharad Pawar

नाशिक :  उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मतदार संघ म्हणजे नाशिक, दिंडोरी, आणि धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये येत्या २० मे रोजी निवडणूक होणार असून, या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दिग्गज नेत्यांचे लक्ष मतदारसंघांकडे या लागले आहे. तर, शरद पवार काल पासून नाशिकमध्ये तळच ठोकून आहेत. दरम्यान, आज ते सटाणा येथे धुळे लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत.

दरम्यान, शरद पवारांच्या सटाणा येथील जाहीर सभेत एक मोठी दुर्घटना टळली. नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गरपीटही सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनाही या पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले.

Dhule Lok Sabha | धुळ्यातील ‘या’ उमेदवाराचा उमेदवारी अर्ज झाला बाद

अवकाळीचा नेत्यांनाही फटका, सभा रद्द 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतरही काही नेत्यांच्या सभा अवकाळी पावसामुळे रद्द झाल्या आहेत. दरम्यान, डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सटाणा येथील जाहीर सभेत बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. शरद पवार यांची सटाणा (Nashik) येथे ही जाहीर सभा सुरू असतानाच वादळी वारा सुरू झाला. यावेळी शरद पवारांचे भाषण सुरू होते. मात्र, तरीही शरद पवार थांबले नाही. त्यांनी भाषण सुरू ठेवलं आणि याचवेळी व्यासपीठावरील बॅनर कोसळले.

Dhule Lok Sabha | काँग्रेसला बालेकिल्ला मिळणार की सुभाष भामरे हॅटट्रिक करणार..? 

Sharad Pawar | नेमकं काय घडलं..?

सटाणा येथील सभेत शरद पवार भाषण करत होते. यावेळी वादळी वारा सुटला आणि या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शरद पवार भाषण करत असताना त्यांच्या मागील बॅनर पडला. व्यासपीठावरील उपस्थित कार्यकर्त्यांनी हा बॅनर वरचेवरच धरला आणि यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, बॅनर कोसळल्याची घटना लक्षात येताच शरद पवारांनी भाषण उरकते घेतले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here