Gold Silver Price 14 May 2024 | गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या होत्या. अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात लोक सोने चांदीची खरेदी करतात. मात्र, या अक्षय तृतीयेला सोन्याने उच्चांकी दर गाठत ग्राहकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. मागील महिनाभरापासून सोन्याच्या दरात होत असलेली वाढ पाहता सोने सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाते की काय..? अशी भीती व्यक्त केली जात होती. (Gold Silver Price 14 May 2024 ) गेल्या आठवड्याच्या सुरुवातीस सोने चांदिने ग्राहकांना दिलासा दिला होता. मात्र, अक्षय तृतीयाला या धातूंनी ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. दरम्यान, आज काय आहेत सोने चांदीचे दर बघूयात…
सोने स्वस्त
मागील आठवड्यात सोन्याच्या किंमती २,०५० रुपयांनी महागल्या. यात १० मे रोजी १,५३० रुपयांनी सोने महागले. तर, आठवड्याच्या शेवटी सोने ३३० रुपयांनी स्वस्त झाले. या आठवड्यात सुरुवातीला सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला असून, १३ मे रोजी सोने १०० रुपयांनी सोने खाली आले. दरम्यान, आज गुडरिटर्न्सनुसार, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ६७,३०० रुपये आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ७३,३८० रुपये असे आहे.
Gold Silver Price 11 May 2024 | सोने-चांदीने केला हिरमोड; असे आहेत सोने चांदीचे दर
चांदीतही घसरण
मागील आठवड्यात चांदी एकूण ४,७०० रुपयांनी महागली. १० मे रोजी चांदीत २,५०० रुपयांची वाढ झाली. तर, ११ मे रोजी ७०० रुपयांनी चांदी स्वस्त झाली. तर, १३ मे रोजी चांदी पुन्हा ५०० रुपयांनी स्वस्त झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव हा ८६,५०० रुपये असा आहे.(Gold Silver Price 14 May 2024 )
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,१६४ रुपये,
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७१,८७५ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६६,१०२ रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५४,१२३ रुपये,
१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,२१६ रुपये असा आहे.
तर, एक किलो चांदीचा भाव हा ८३,४९४ रुपये असा आहे. (Gold Silver Price 14 May 2024 )
(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)
Gold Silver Price 26 April 2024 | सोने-चांदी स्वस्त; असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम