Imtiaz jalil | हैदराबाद (Hyderbad) येथे नवनीत राणा (Nanvneet Rana) यांनी ओवैसी बंधुंवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या दोन दिवसांपासून राणा विरुद्ध ओवैसी हा वाद सुरू असून यात आता छत्रपती संभाजी नगरचे विद्यमान खासदार आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनीही उडी मारली आहे.
आज चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व उमेदवार आज आपली ताकद पणाला लाऊन मतदार संघात फिरत असून, शिंदे गटाचे संदिपान भुमरे, ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील (Imtiaz Jalil)या तिन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.
इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आज रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी बोलताना, त्यांनी नवनीत राणांवर जोरदार टिका केली. “असे काही लोक भाजपने फक्त भुंकण्यासाठी ठेवलेले आहेत. नवनीत राणा ही चिप मेंटॅलिटीची बाई आहे, असे ते म्हणाले.
Navneet Rana | हे १५-२० कोटी असलेले खुलेआम धमकी देतात..?; राणांचा ओवेसींवर हल्लाबोल
Imtiaz jalil | हनुमान चालिसा ठाकरेंच्या घरासमोरच का वाचायची होती..?
भारतीय जनता पक्षाला काही भुंकणारे लोक हवे असतात. याअगोदर त्यांनी ते हैदराबादचे आमदार भूंकण्यासाठी सोडले होते. तो संपलाय म्हणून या बाईला आता सोडलंय. नवनीत राणा ही एक अत्यंत चिप मेंटॅलिटीची बाई आहे. तुमचा धर्म आहे आणि त्याचा आम्ही आदर करतो. पण हनुमान चालिसा तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या घरासमोरच का वाचायची होती..?
चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ही बाई कोणत्याही इशूला मोठं करत असते. कॅमेरा दिसला की आपली शूटिंगच सुरू आहे, असं या बाईला वाटतं. ओवैसी साहेब हे चार टर्मचे खासदार आहेत, त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. पण, या नवीन आलेल्या बाईला हे काहीच कळत नाही. जर तिला तुम्ही म्हणाले की, मी कव्हरेज देतो तर ती डान्स सुद्धा करायला तयार होईल, असा जोरदार पलटवार जलील (Imtiaz Jalil) यांनी रणांवर केला.
Shivsena UBT MNS Clash | ‘उठ दुपारी घे सुपारी’; मनसे-ठाकरे गटाचा राडा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम