Narayan Rane | तर, शरद पवार ८४ वर्षे जगले नसते; भाजप नेत्याची जीभ घसरली

0
65
Sharad Pawar
Sharad Pawar

Narayan Rane |  लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष प्रचार करताना आणि विरोधकांवर टिका  करताना आहे. गेल्या काही दिवससांपूर्वी मोदी यांनी एका सभेत शरद पवारांवर ‘भटकती आत्मा’ अशी  टिका केल्यानंतर आता यावरून राज्याचे राजकारण पेटले आहे. दरम्यान, आज पुन्हा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजप उमेदवार नारायण राणे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Narayan Rane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एका प्रचार सभेत शरद पवारांवर केलेल्या ‘भटकती आत्मा’ या टीकेमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मोदींच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले होते की,  “माझ्या स्वार्थासाठी नाहीतर, शेतकऱ्याचे दुखणे मांडण्यासाठी मी अस्वस्थ आहे. त्यावरून आज नारायण राणे यांनी शरद पवार हे आजपर्यंत कधीच अस्वस्थ झाले नाही, आणि झाले असते तर, ८४ वर्ष जगले नसते, असे म्हटले आहे.

Nilesh Rane | टिका करणे राणेंना भोवले; ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून तूफान दगडफेक

Narayan Rane | तर, ते ८४ वर्ष जगले नसते

तब्बल चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री, १२ वर्षे केंद्रीय मंत्री व दोन वर्षे देशाचे संरक्षणमंत्री पद असूनही शरद पवार काही करु शकले नाही. गेल्या ८४ वर्षांत शरद पवार (Sharad Pawar) हे कधीही राज्यातील विकास कामांसाठी अस्वस्थ झाले नाही. मी एक राजकारणी आहे. मी देखील काही व्यक्तींचा अभ्यास केला आहे. आता शरद पवारांचे वय हे आता ८४ आहे. जर, शरद पवार हे आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते. तर, ते ८४ वर्ष जगले नसते, असे म्हणत नारायण राणेंनी (Narayan Rane) शरद पवारांवर टीका केली आहे.(Narayan Rane)

Nitesh Rane | बेबी पेंग्विनला लवकरच अटक होणार – आ. राणे

सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नाही

त्यांच्या ८४ वर्षाच्या आयुष्यात ते कधीही विकास कामासाठी अस्वस्थ झाले नाही. आता माणसाला हवामान बदल झाला की 50-55 व्या वर्षीच अटॅक येतो आणि माणसे जातात. ८४ वर्षात जग इकडचं तिकडे होतं. पण शरद पवारांना मात्र काहीही होत नाही, ते बिनधास्त असतात. आणि वरुन मोदींना सांगतात की तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता काही जाणार नाही. पण आमचं सरकार हे जाणार नाही. तर, यावेळी ४०० पेक्षाही जास्त खासदार निवडून येतील आणि मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. (Narayan Rane)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here