द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; दिल्ली (Delhi) येथे केजरीवाल सरकार ने पेट्रोल (Petrol) अजून 8 रुपयाने स्वस्त केले आहे.
भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील कर अनुक्रमे 5 आणि 10 रुपायांनी कमी केले. त्यामुळे पेट्रोल – डिझेल चे दर खूप कमी झाले.
केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्यानंतर अनेक राज्यांनी देखील पेट्रोल – डिझेल चे दर आपापल्या स्तरावर कमी केले.
त्यात आता दिल्ली सरकारने देखील पेट्रोल चे दर अजून 8 रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे दिल्लीकरांना खूप दिलासा मिळाला आहे.
दिल्लीत केजरीवाल यांनी पेट्रोलचे दर कमी केले. त्याप्रमाणे आधी बऱ्याच राज्यांनी देखील पेट्रोल चे दर कमी केले.
मात्र महाराष्ट्र सरकार यावर अद्याप एक अवाक्षर देखील बोलण्यास तयार नाही.
यामुळे महाराष्ट्रात जनतेत नाराजीचे वातावरण आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून आत्तापर्यंत बऱ्याच बाबींमध्ये जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत.
आता केजरीवाल यांनी पेट्रोल चे देखील दर कमी केल्याने, जनता समाधान व्यक्त करत आहे.
आधीच देशभराच्या तुलनेत दिल्ली येथे इंधनाचे दर कमी असतात. त्यात आता पेट्रोलच्या दरात थेट 8 रुपयांची कपात होणार आहे.
दरम्यान, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरत चालले आहेत. आणि मागील जवळपास 20 दिवसांहून अधिक काळापासून भारतात इंधनाचे दर स्थिर आहेत.
जागतिक बाजारपेठेत होणाऱ्या या कच्च्या तेलाच्या दरांमधील घसरणीमुळे इंधनाच्या दरांमध्ये अजून कपात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आता भारतात जागतिक बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर इंधन दर कमी होणार का? याची सारे वाट पाहत आहेत.
ही बातमी वाचलीत का?
कोरोनाचा (Corona) प्रभाव कमी झाल्या नंतर शाळा (School) सुरू झाल्या आहेत. आता अजून एका शाळेत मात्र 40 हुन अधिक कोरोना बाधित आढळले आहेत.
तेलंगणा (Telangana) राज्याच्या सांगा रेड्डी जिल्ह्याच्या महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) मागासवर्गीय कल्याण विद्यालयातील सुमारे 40 हुन अधिक विद्यार्थिनी (Students) कोरोना बाधित आढळल्या आहेत. या घटनेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नुकतेच एका मेडिकल कॉलेज मध्ये 250 हुन अधिक विद्यार्थी कोरोना बाधित आढळले होते. आणि आता पुन्हा दुसऱ्या एका शाळेत कोरोना बाधित आढळले.
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने, देशभरात शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत येत आहेत.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] पेट्रोलचे दर झाले अजून 8 रुपयांनी स्वस… […]