Nitin Gadkari | सध्या ऐन उन्हाळ्यात उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते मैदानात उतरले आहेत. पहिल्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडली असून, यात नागपूरसह गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या मतदार संघांचा समावेश होता. दरम्यान, आपल्या मतदार संघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता नितीन गडकरी हे इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.(Nitin Gadkari)
आज ते यवतमाळच्या पुसद येथे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यासाठी आले असता, त्यांना अचानक भरसभेत भाषणादरम्यान भोवळ आली आणि त्यामुळे त्यांचा तोल जाणार होता. तेवढ्यात अंगरक्षकांनी सावरले आणि पुढील अनर्थ टळला. यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत भाषण करत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. यावेळी त्यांना अंगरक्षकाने आणि मंचावरील इतर उपस्थितांनी सावरलं आणि यानंतर त्यांना उपचारासाठी नेल्याची माहिती समोर आली आहे.(Nitin Gadkari)
Sunetra Pawar | बायकोला निवडून द्या, तुम्हाला माझाही फायदा; कारण बायको म्हणाली, “अहो…”
Nitin Gadkari | उष्णतेमुळे गडकरींना भोवळ
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेतेदेखील उमेदवारांच्या प्रचारासाठी सरसावले आहेत. सगळीकडे सध्या या बड्या नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. महायुतीनेही 400 पारचे मिशन यशस्वी करण्यासाठी प्रचारासाठी केंद्रीय नेत्यांना मैदानात उतरवले आहे. आज अमरावतीतही अमित शाह यांची जाहीर सभा असून, यवतमाळमध्ये नितीन गडकरी यांची सभा होती. यावेळी उष्णतेमुळे गडकरींना सभेदरम्यान भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, काही क्षणांच्या विश्रांतीनंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली होती. (Nitin Gadkari)
देशात मोदी सरकार आणायचे असेल तर..
मोदी सरकारने सिंचन, ऑर्गनिक फार्मिंग, यांसारखी जी धोरणे आखली. त्याचा लाभ आता होताना दिसत आहे. प्रत्येक गाव कसे समृद्ध होईल, हा यामागचा विचार असून, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचे असेल तर, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन यावेळी गडकरिंनी केले. (Nitin Gadkari)
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस हा एकच बाप भेटला जो शरद पवारांना पुरुन उरला..
गडकरींनी सांगितलं भोवळ का आली..
उन्हामुळे आमच्या हेलिकॉप्टरमधील एसी हा बंद होता. हवा नसल्यामुळे आणि तापमान जास्त असल्याने मला थोडा त्रास झाला. मात्र आता थोडा आराम करून मी पुन्हा आलो. त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल मी तुमची क्षमा मागतो. असं म्हणून गडकरी पुन्हा भाषणाला उभे राहिले. भाषण करतानाच नितीन गडकरी यांना भोवळ आल्यामुळे जवळपास 10 मिनिटे त्यांचे भाषण थांबवले गेले होते. मात्र काहीवेल आराम करून त्यांनी पुन्हा आपले भाषण सुरु केले. (Nitin Gadkari)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम