द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कोरोनाचा (Corona) प्रभाव कमी झाल्या नंतर शाळा (School) सुरू झाल्या आहेत. आता अजून एका शाळेत मात्र 40 हुन अधिक कोरोना बाधित आढळले आहेत.
तेलंगणा (Telangana) राज्याच्या सांगा रेड्डी जिल्ह्याच्या महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) मागासवर्गीय कल्याण विद्यालयातील सुमारे 40 हुन अधिक विद्यार्थिनी (Students) कोरोना बाधित आढळल्या आहेत. या घटनेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नुकतेच एका मेडिकल कॉलेज मध्ये 250 हुन अधिक विद्यार्थी कोरोना बाधित आढळले होते. आणि आता पुन्हा दुसऱ्या एका शाळेत कोरोना बाधित आढळले.
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने, देशभरात शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत येत आहेत.
मात्र कोरोना बाधित आढळण्याच्या या दुसऱ्या घटनेने चिंतेचे ढग दाटले आहेत.
जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर सारे काही बंद करण्यात आले होते. शाळा, सार्वजनिक वाहतूक, मॉल्स असे सारे काही बंद झाले.
संपर्कातून पसरणाऱ्या या कोरोनाला अटकाव करण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात होते.
आता कोरोनाच्या दोन लाटांनंतर काहीशी विश्रांती कोरोनाने घेतली. असे वाटत असतांनाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे.
जगभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. बहुतांश ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आहे.
कोरोनाचा ओमीक्रोन हा नवा प्रकार आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे भारतात देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शाळा सुरू करताना सर्व त्या प्रकारच्या काळजी घेण्याच्या सूचना शैक्षणिक प्रशासनांना करण्यात आल्या होत्या.
मात्र काळजी घेऊन देखील शाळेमध्ये कोरोना बाधित आढळण्याचे प्रकार समोर येत असल्याने चिंता वाढली आहे.
बऱ्याच शैक्षणिक प्रशासनांद्वारे कोरोनाचा एकही बाधित आढळल्यास थेट शाळा बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मास्क लावणे, सॅनिटाईज करणे अशी सारी काळजी घेतली जात असतांना, कोरोना बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे.
तेलंगणा मधील या शाळेत 40 हुन अधिक विद्यार्थिनी आणि एका शिक्षकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या सर्वांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.
ही बातमी वाचलीत का?
नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाचा (Cowid) नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण होते. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेतुन (South Africa) परतलेल्या खेळाडूंमुळे (Players) हे चिंतेचे वातावरण होते.
दक्षिण आफ्रिकेत नुकतीच आयर्न मॅन (Iron Man Competition) स्पर्धा पार पडली. ज्यात नाशिक (Nashik) मधल्या दोघांनी देखील सहभाग नोंदवला होता.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा..
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]