Nashik Breaking | नाशिकमध्ये सुरू असलेल्या मोर्चा दरम्यान आंदोलकाचा मृत्यू

0
38
Nashik Breaking
Nashik Breaking

Nashik Breaking |  काल जिल्ह्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आदिवासी  संघटनांच्या वतीने माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १० हजार आंदोलकांचे लाल वादळ हे नशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.(Nashik Breaking)

यावेळी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘महामुक्कामी आंदोलन’ करणार असल्याचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी सांगितले होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, यावेळी चर्चा निष्फळ ठरली असून आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

Nashik Breaking | आंदोलकाचे निधन 

दरम्यान, काल या लॉन्ग मार्चमध्ये एका वृद्ध आंदोलकाचे निधन झाले आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आणि कामगारांचे हे आंदोलन सुरू असताना त्यातील आंदोलक भाऊसाहेब बाबुराव गवे (वय – ६५, रा. कसबे सुकेने) यांचे निधन झाला आहे. यासह आणखी तीन आंदोलकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे इतर आंदोलक हे आक्रमक झाले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. (Nashik Breaking)

Nashik News | नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

आता २४ तास डॉक्टररांसह ॲम्बुलन्सची व्यवस्था 

जिल्हा न्यायालयासमोर त्यांना भोवळ आली म्हणून शासकीय जिल्हा रुग्णालयात नेले असता या आंदोलकाचा मृत्यू झाला होता. हृदय विकार किंवा अशक्तपणामुळे मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता आंदोलनस्थळी २४ तास डॉक्टररांसह ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा सिव्हील सर्जन यांना पालकमंत्री महोदयांकडून सूचना करण्यात आल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here