NCP Sharad Pawar | सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भाजपामध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला. महाराष्ट्र काँग्रेसला लागलेली गळती आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची कमी झालेली संख्या आणि राजकीय ताकद पाहता आता शरद पवार गटाचे अध्यक्ष आणि राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे एखादी मोठी राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
यातच टीव्ही 9 ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी शरद पवार गट हा आता काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांच्या गटातील सर्व आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलवली आहे. राज्यात सध्या ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बैठक बोलावल्याचे सांगितले जात आहे. तसेच या बैठकीत राज्यसभा व लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरू असून, या शिवाय शरद पवार गट हा काँग्रेस पक्षात विलीन करण्यातबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.(NCP Sharad Pawar)
Ashok Chavhan | अशोकरावांना कुठल्याही पदाचा मोह नाही; पक्षप्रवेशानंतर कोण काय म्हणाले..?
शरद पवार गटाचे नेते म्हणाले…
राष्ट्रवादी शरद पवार गट आता काँग्रेस मध्ये विलीन होणार असल्याची माहिती समोर आली असून, यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप शरद पवार गटाकडून या बाबतीत कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसून, शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल हे याबाबत म्हणाले की, “शरद पवार हे आजच्या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय आहे. पक्षाचे वरिष्ठ नेतेच याबाबतचा निर्णय घेतील. मात्र याबाबत पवारांनी बोलावलेल्या बैठकीत चर्चा सुरु असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले आहे.(NCP Sharad Pawar)
Congress | इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचाही काँग्रेसला रामराम..?
NCP Sharad Pawar | पुण्यात बैठक सुरू…
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुण्यात पक्षाची महत्त्वाची बैठक बोलवली असून, शरद पवार हे स्वतः लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकींसाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे, अनिल देशमुख, खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील आदि नेते उपस्थित आहेत. पुणे येथील मोदी बागेतील शरद पवारांच्या कार्यालयात ही बैठक सुरू आहे.(NCP Sharad Pawar)
देशभरात सध्या निवडणुकींचे वातावरण आहे. लोकसभा व त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याआधीच राष्ट्रवादीचे दोन गट पडले असून, यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह आजिर पवारांना बहाल केले. गेल्या दोन दिवसात काँग्रेसमध्येदेखील मोठी राजकीय उलथापालथ झाली. ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपला मिठी मारली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सांगितल्यानुसार, काँग्रेसचे आणखी काही आमदार हे भाजप मध्ये येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. या सगळ्या घडामोडी पाहता, शरद पवार हे मोठी राजकीय गुगली टाकण्याच्या तयारीत आहे. (NCP Sharad Pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम