Chhagan Bhujbal | आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी अशा या दोन्ही पक्षांमध्ये उभी फुट पडल्यानंतर या पक्षांचे दोन गत पडले. यानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण हा शिंदेंकडे आणि राष्ट्रवादीचे घड्याळ आता नुकतेच निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे दिले. दरम्यान, सातत्याने अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्या वयावर टिका करत त्यांना थांबण्याचा सल्ला दिला जातो. यातच अजित पवारांनंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आता शरद पवारांना थांबण्याचा सल्ला दिला आहे.
भुजबळ म्हणाले की, “आताचा हा जमाना तरुणांचा आहे. आताचे राजकारण हे तरुणाईच्या हातात आहे. शरद पवार व त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्वांनीच पुनर्विचार करायला हवा. नाही पुनर्विचार केला तरी त्यांनी किमान थांबावे. आधी तुमच्या पुढे काय ठेवले आहे ते पहा. मी देखील राष्ट्रवादीच्या जन्मापासून पक्षात होतो. पण आता महिला, पुरुष व तरुणांचे जे संघटन अजित पवारांच्या माध्यमातून उभारले जात आहे. ते पहा व पुनर्विचार करा, असा खोचक सल्ला अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार यांना हा सल्ला दिला आहे. (Chhagan Bhujbal)
Chhagan Bhujbal | नाशिकमधील अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे मंत्री भुजबळांचे निर्देश
Chhagan Bhujbal | ते स्वतःला तरुणाईचे नेते म्हणवतात
कर्जत जामखेडचे एक तरुण आणि जाणते नेते आहेत. तेच स्वतःला तरुणाईचे नेते म्हणवतात. मात्र, त्यांच्या आजूबाजूला काही पगारी तरुण असतात. इथं बघा हे स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत. असा हल्लाबोल भुजबळांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर थेट नाव न घेता केला. पुढे ते म्हणाले की, “काही म्हणताय पक्ष चोरला, कोणी आणखी काही म्हणतंय. मात्र एक लक्षात ठेवा की ही लोकशाही आहे. ज्याच्या बाजूने बहुमत असेल. त्यांच्याबाजूने येथे निर्णय लागतो. म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह हे आम्हाला मिळाले आहे.
एकमेकांचे पाय खेचणे बंद करा
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला आता हे जे चिन्ह मिळाले आहे, त्याचा सगळा वाटा माझा आहे. कारण, हे चिन्ह मिळवून देण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळं आता कोणालाही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. पक्षातील कार्यकर्त्यांना सल्ला देताना ते म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुका या आता अगदी तोंडावर आल्या आहेत. यात तुम्ही जीव तोडून काम करावे. आपल्या सर्व कामांचा हिशोब केला जाईल. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये याचा विचार केला जाईल. मात्र, एकमेकांचे पाय खेचणे बंद करा. तुम्ही खेकड्याच्या वृत्तीने काम करू नका. संकटं खूप येतील. अडचणीही येतील. पण काळजी करू नका.(Chhagan Bhujbal)
Loksabha | राम मंदिराच्या चर्चेदरम्यान लोकसभेत ‘बाबरी मशीद झिंदाबाद’चे नारे
मराठा आरक्षणाला आम्ही खंबीर पाठिंबा
आपण जरी आता भाजपसोबत गेलेलो असलो. तरी आमची विचारसरणीही तीच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नसून, भाजपनंतर राज्यात दुसऱ्या नंबरचा हा आपला पक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची पूर्वीपासूनच भूमिका राहिलेली आहे. आम्ही दरवेळी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तसेच अजूनही देऊ, आताही मराठा आरक्षणाला आम्ही खंबीर पाठिंबा देऊ. पण यासाठी कुठल्याही समाजाला दुखावून चालणार नाही. आपल्याला सगळ्या समजाला सोबत घेऊनच पुढे जावं लागणार आहे.
आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचेय
आता आपल्याला अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे सगळी शक्ती पणाला लावून पुढे जावे लागणार आहे. पाय घसरला तर उभा टाकता येतो. पण जीभ घसरली तर आयुष्यभर माणूस उठू शकणार नाही. त्यामुळे कोणालाही दुखवू नका, असे कार्यकर्त्यांना संबोधित करताना भुजबळ म्हणाले.(Chhagan Bhujbal)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम