Uddhav Thackeray | आजचा दिवस हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण होता. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केले. यात त्यांनी अनेक घोषण केल्या तर, कही तरतुदीही केल्यात. मात्र, नागरिक यामुळे फार काही संतुष्ट असल्याचे दिसत नाही. हे शेवटचे अर्थसंकल्प असून, यात काही मोठ्या घोषणा होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच फार अपेक्षा होत्या. मात्र, यात विशेष असं काहीही घोषित केलं नाही. दरम्यान, दुसरीकडे आज रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘जनसंवाद यात्रा’ पार पडली. या सभेतून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“आज हा शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला. मी काय बोललो ‘शेवटचा’. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहेत. आजचा हा ‘अर्थसंकल्प’ म्हणजे ‘टोपी’ घालण्याचा प्रकार असल्याची खोचक टिका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आहेत. आज पेण येथे त्यांची सभा झाली. यावेळी तेथे ते बोलत होते. (Uddhav Thackeray)
Budget 2024 | बजेटमध्ये महिला आणि शेतकऱ्यांसाठी काय..?
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही. मी गेल्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरत होतो. म्हटलं आता तुम्हाला भेटूयात. मी स्वतः आता सर्व विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. आणि याचीच सुरुवात आज पेणपासून झाली. आज शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. मी काय बोललो ‘शेवटचा’. निर्मला सीतारामन यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आज हा अर्थसंकल्प मांडल्याची टिका उद्धव ठाकरे यांनी केली.
Uddhav Thackeray | हे तुमच्यासाठी जादूचे प्रयोग
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,”तुम्ही तर शेतकऱ्यांना अतिरेकी समजत होतात आणि आता त्यांच्याबद्दल बोलताय. हे सगळे यांचे जादूचे प्रयोग सुरु आहे. आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘टोपी’ घालण्याचा प्रकार. आता हे महिलांना फुकट सिलेंडरही देतील. तरुणांना नोकऱ्या देणार असेही ते म्हटले मग यांनी गेली १० वर्षे काय केलं? आता यांच्यासाठी खड्डा खाणायचा, मग त्यावर मतांची माती टाकून यांना गाडायचं. आता ठिकठिकाणी जाऊन येत्या १० वर्षातील या सरकारच्या कामाचा आढावा घ्या, अर्थसंकल्पात जे मांडलं गेलं त्यात किती मिळाले? असा सवालही यावेळी ठाकरेंनी केला. (Uddhav Thackeray)
Budget 2024 | ‘सबका साथ सबका विकास’; मोदी सरकार आज जनतेला काय देणार..?
तुम्ही जागताय की मरताय हे बघायलाही…
“आमच्या सरकारच्या काळात आम्ही आपटतिग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत केली. तेव्हा हे पंतप्रधान फिरकले सुद्धा नाही आणि आता हेच पंतप्रधान महाराष्ट्राच्या वाऱ्या करताय. आता यांना तुमच्याकडून मतं पाहिजे आहेत तर, “मेरे प्यारे देशवासीयो” सुरु आहे. एकदा मतं द्या आणि मग बघा, तुम्ही जागताय की मरताय हे बघायलाही ते येणार नाहीत. यांचा विकास म्हणजे तुम्हाला चिरडणे” अशी सणसणीत टोलेबाजी यावेळी ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी केली. (Uddhav Thackeray)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम