Gold Silver Rate Today | आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या थोडाच वेळात बजेट सादर करणार आहेत. दरम्यान, या बजेटच्या सादरीकरणाआधीच सोने-चांदीच्या किंमतीत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या आता काही वेळातच अंतरिम बजेट सादर करणार असून, आता या बजेटनंतर सोने-चांदीच्या दरांमध्ये कोणते बदल होतात. याची सर्वांमध्येच उत्सुकता आहे. मागील वर्षी अंतरिम बजेटपूर्वी सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती. त्यानंतर मागील वर्षी दिवाळीत सोने-चांदिने उच्चांकी दर गाठले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच दरांमध्ये घसरण सत्र सुरू होते. मात्र, आता या अंतरिम बजेटनंतर या धातूंच्या दरांमध्ये काय बदल झालेत ते बघूयात…(Gold Silver Rate Today)
Gold Silver Rate Today | सोने-चांदीने आठवड्याची केली दमदार सुरुवात
सोने महागले
मागील वर्षी सोने-चांदीचे दर हे विक्रमी होते. मात्र, या नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात दर लगातार खाली येत होते. त्यामुळे सामान्य ग्राहक सुखावले होते. जानेवारीत सोन्याचे दर हे तब्बल २,२०० रुपयांनी खाली आले आहेत. तर या दोन दिवसांत सोन्याचे दर हे ३२० रुपयांनी वाढले आहेत. २९ जानेवारी रोजी दर १०० रुपयांनी वाढले तर, ३० जानेवारीला दर २२० रुपयांनी पुन्हा वाढले. ३१ जानेवारी रोजी सोन्याचे दर स्थिर होते. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५८,१५० रुपये तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६३,४२० रुपये असा आहे.
चांदी घसरली
या नवीन वर्षात जानेवारी महिन्यात चांदीनेही सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या महिन्यात चांदीच्या किंमतींमध्ये ४,४०० रुपयांनी घसरण झाली. मात्र, मागील आठवड्यात १,००० रुपयांनी दर घसरले होते. तर, या आठवड्यात ५०० रुपयांनी महागले. २९ जानेवारीला दर २०० रुपयांनी वाढले. तर, ३० जानेवारीला दर ३०० रुपयांनी वाढल् . ३१ जानेवारी रोजी चांदीच्या किंमती स्थिर होत्या. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचा दर हा ७६,५०० रुपये असा आहे.(Gold Silver Rate Today)
Gold Silver Rate Today | सोने-चांदी झाले स्वस्त; असे आहेत आजचे दर
असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज अंतरिम बजेटच्या आधीच सोन्याचे दर वाढले असून, चांदीचे दर खाली आले आहे. प्रति कॅरेटनुसार असे आहेत सोनेचे दर…
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६२,६८५ रुपये,
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६२,४३४ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५७,४२० रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४७,०१४ रुपये,
१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ३६,६७१ रुपये असे आहेत.
तर, एक किलो चांदीचा दर हा ७१,६६८ रुपये असा आहे. (Gold Silver Rate Today)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम