Maratha Reservation | आता मराठ्यांनी ‘एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं…

0
30
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation |  मराठा समाजाचा संघर्ष काल संपला. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. मात्र, असे असले तरीही राज्य सरकारने या अधिसूचनेवर येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. यावर सर्व पक्षीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, सर्वांनी मनोज जरांगे आणि सकल मराठा समाजाचे अभिनंदन केले आहे. आता यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maratha Reservation | काय म्हणाल्या पंकजा मुंडे..?

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी दिली आहे. त्यामुळे या काळात काय आक्षेप येतात, ते कायद्यात बसतील का ? हे पाहावे लागणार आहे. मराठा समाजाला कायद्यात बसणारे आरक्षण मिळालेच पाहिजे ही माझी वेळोवेळी भूमिका राहिलेली आहे. जेव्हा या अध्यादेशावर शिक्कामोर्तब होईल तेव्हाच खऱ्याअर्थाने अभिनंदन करता येईल असे मला वाटते.

तर, आता कुणबी प्रमाणपत्रे घेऊन मराठा समाजातील एक पिढी ओबीसीत आलेली आहे. तर मराठ्यांनी आता ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणायची काहीच गरज नाही. मराठ्यांनी आता ‘एक ओबीसी, लाख ओबीसी’ म्हणायला हवं, असे मला वाटते. यामुळे त्यांचा विजय नकारात्मक वाटणार नाही. त्याचबरोबर लोकांच्या मनावर कुठलाही ओरखडा ओढला जाणार नाही, असं मत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडलं आहे.(Maratha Reservation)

Maratha Reservation | लेकरांनो आता खूप मोठे व्हा; जरांगेंची मराठ्यांना साद

त्या म्हणाल्या की, “ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. ज्यांनी अनेक वर्ष प्रमाणपत्रे घेतली नाहीत, ते लोक आता ओबीसीत येणार आहेत. तसेच ते लोक राजकीय आरक्षणाचाही भाग होणार आहे. ही अपरिहर्यता आहे आणि ती स्वीकारलेली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देऊन ते ओबीसी झाल्याने ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणात नक्कीच बदल होतील. तर, आता या गोष्टीला सकारात्मक विराम लागला पाहिजे. कुणबी प्रमाणपत्रे घेऊन समाजासमाजात असंतोष वाटेल असं वातावरण न होऊ देणे. ही मराठा आंदोलक आणि त्याचबरोबर सरकारची जबाबदारी असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

मनोज जरांगे यशस्वी झाले 

गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्र तणावपूर्ण वातावरणातून जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट आणू पाहत आहेत. अश्या प्रकारच्या प्रवृत्तींना आपण आळा घातला पाहिजे. सरकारने अध्यादेश काढला आहे. तर, सर्वसंमतीने अध्यादेश निघालेला असावा. या अध्यादेशात मराठा समाजाच्या ज्याही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी मांडल्या आहेत, त्यातीलच एका मागणीवर महत्त्वाचा प्रकाश टाकला जाईल. मराठा समाजाला कुणबीच प्रमाणपत्रे द्यावे. यात सगेसोयरे यांची व्याख्या केलेली आहे. आज देखील लाखो कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला कुठेतरी सकारात्मक मार्ग मिळाला आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा हे साध्य करायला मनोज जरांगे यशस्वी झाले, हे देखील म्हणायला हरकत नाही.(Maratha Reservation)

Maratha Reservation | मराठ्यांच्या ४ महीने २८ दिवसांच्या संघर्षाला यश

ओबीसीत दाटीवाटी होऊ शकते

तसेच आरक्षण द्या मात्र ओबीसीला धक्का न लावता, अशी मागणी आम्ही केलेली आहे. यात पूर्वीच्या काळात पर्यायाने कुणबी प्रमाणपत्रे काहींनी घेतली आहेत. ती विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही लोकांनी घेतली आहे. तर, मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र घेतले नाहीत. आता हीच पिढी कुणबीत येते आहे. कुणबीत आल्यानेच ओबीसीत आलेत. ओबीसीत जेवढी संख्या वाढतेय त्यामुळे नक्की ओबीसीत दाटीवाटी होऊ शकते. यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे. परंतु, हा धक्का सकारात्मककडे कसा न्यायचा हे सरकारच बघेल. दोन समाजातील वितुष्ट संपवायला हवे. हा निर्णय टिकल्यानंतर किमान जातीवाचक तेढ होऊ नये ही अपेक्षा पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.(Maratha Reservation)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here