Manoj Jarange Mumbai | गेल्या २० जानेवारीपासून मनोज जरांगे हे असंख्य मराठा बांधवांसह मुंबईकडे निघाले होते. आज नवी मुंबईत मराठ्यांचे वादळ धडकले असून, यामुळे सरकारलाही धडकी भरल्याचे दिसून आले. सरकारकडून सकाळपासून वेगाने सूत्र फिरवले गेले. सरकारचे शिष्टमंडळ हे जरांगे यांच्या भेटीला आले होते. त्यांची एक तास मनोज जरांगेंशी चर्चा झाली असून, ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांसोबत चर्चा कारणार असल्याचे सांगितले होते. (Manoj Jarange Mumbai)
मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून आरक्षण मिळावे. तसेच ज्यांचे कुणबी पुरावे आहेत त्यांच्या सगे-सोयऱ्यांनाही कुणबी म्हणून आरक्षण दिले जावे अशी प्रमुख मागणी आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेआधी मनोज जरांगे यांनी वकिलांसोबतही चर्चा केली होती. कुठलाही निर्णय मी एकटा घेऊ शकत नसून, मी माझ्या समाजासोबत चर्चा करेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. याआधी साऊंड सिस्टिम कमी असल्यामुळे जरांगेंचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळे अंत २ वाजता ही जाहीर सभा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही सभा पार पडली.
Maratha Morcha | मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य..?
यावेळी जरांगे यांनी मराठा समाज बांधवांसमोर सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या जीआरचे वचन करून दाखवले. यात काही मागण्या मान्य झाल्यात तर, काही सुधारणा आहेत. या बाबतचे अध्यादेश हे उद्या सकाळपर्यंत येणार आहेत. त्यामुळे त्यांनी तुर्त आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय स्थगित केला आहे. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत या मागण्यांचे सर्व अध्यादेश हे मिळणार आहे. ते मिळाल्यानंतर विजयाचा गुलाल घेऊनच परत जाऊ, असे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
या मागण्या झाल्या मान्य..?
१. कुणबी नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळावे. म्हणजेच एका कुणबी नोंदीवर पाच नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळाले तरी दोन कोटी मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात जाईल. मात्र, नोंदी मिळाल्या असलेल्या परिवाराने प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करावा. आता ५४ लाख नाही ५७ लाख कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत. तसेच यापैकी आतापर्यंत ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेले आहे.
Maratha Morcha | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आजच तोडगा निघणार..?
२. न्या. शिंदे समिती ही रद्द करू नये ही मागणीदेखील मान्य झाली आहे. सरकारने दोन महिन्यांची मुदत वाढवली आहे. तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचेही मान्य करण्यात आले आहे.
३. सगे-सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र मिळायला हवे. त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदाच होणार नाही. महाराष्ट्रातील ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंद नाही, त्या समाज बांधवांनी शपथपत्र करुन द्यायचे आहे. तसेच त्या शपथपत्राच्या आधारावरच त्या व्यक्तीला प्रमाणपत्र दिले जाईल. हे शपथपत्र १०० रुपयांना असून, ते आता मोफत दिले जाईल.
४. आंतरवाली सराटीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घ्यायचे. गृहविभागाकडून याबाबत पत्र आलेले नाही. ते पत्र हवे असून, तेही लवकरच मिळणार आहे.
५. मराठा आरक्षणाच्या क्युरीटीव्ही पिटीशनचा विषय हा सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत आणि सगे सोयऱ्याच्या माध्यमातून एखादा व्यक्ती राहिलाच तर, यामुळे मराठा समाजातील सर्व लोकांना शंभर टक्के शिक्षण हे मोफत देण्यात यावे हीदेखील मागणी मान्य झाली.
६. तसेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत कुठलीही सरकारी भरती करायची नाही. सरकारी भरती झाल्या तर, मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवायच्या ही मागणीदेखील मान्य झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम