Gold Silver Rate Today | सोने-चांदी झाले स्वस्त; असे आहेत आजचे दर

0
55
Gold Silver Price 30 May 2024
Gold Silver Price 30 May 2024

Gold Silver Rate Today |  या महिन्यात सोने चांदिने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमती मध्ये सातत्याने पडझड सुरू आहे. ३ जानेवारीपासून हे दर लगातार खाली येत आहेत. किरकोळ दर वाढ वगळता, मोठी घसरण सुरू आहे. गेल्या १५ दिवसांतच सोन्याच्या किंमतींमध्ये तब्बल २,१५० रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीच्या किंमतींमध्ये ४,४०० रुपयांची पडझड झाली आहे. आयोध्यातील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळ्यानंतर सोने चांदीच्या दरांत घसरण झाली असून, असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर…

असे आहेत सोन्याचे दर..?

नव वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याने ग्राहकांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. ३ जानेवारीपासूनच दर सतत घसरत आहेत. किंचित दरवाढ वगळली तर, किंमतींमध्ये घसरगुंडी सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर हे २,१५० रुपयांनी खाली उतरले आहेत. मागील आठवड्यात १९ जानेवारी रोजी ३३० रुपयांची आणि २० जानेवारीला १०० रुपयांनी किंमतीतींमध्ये वाढ झाली होती. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५७,९५० असा आहे. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,२०० रुपये इतके आहे. (Gold Silver Rate Today)

Gold Silver Rate Today | राम मंदिराच्या सोहळ्यानंतर, असे आहेत सोने-चांदीचे दर

Gold Silver Rate Today | असे आहेत चांदीचे दर..?

सोन्याच्या पाठोपाठ चांदीनेही जानेवारी महिन्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या वर्षी सोनेच नाही तर चांदीही तेजीत होती. मात्र, आता दोघांचेही दर खाली उतरले आहेत. १० जानेवारी ते १५ जानेवारी याकाळात चांदीच्या दरांत १,४०० रुपयांची वाढ झाली होती. मात्र, त्यापूर्वीच चांदीच दर हे ३,१०० रुपयांनी खाली आले होते. १९ जानेवारी रोजी चांदीचे दर हे २०० रुपयांनी वाढले. तर, २० तारखेला दर तितकेच खाली आले. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचे दर हे ७५,००० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)

Gold Silver Rate Today | सोने-चांदी खरेदीसाठी आजचाच मुहूर्त गाठा; असे आहेत आजचे दर

असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे दर..

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोने आणि चांदीचे दर हे घसरले असून, प्रति कॅरेटनुसार असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,३५५ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने –  ६२,१०५ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५७,११७ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४६,७६६ रुपये,

१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ३६,४७८ रुपये असे आहेत.

तर, एक किलो चांदीचा आजचा दर हा ७०,३११ रुपये असा आहे. (Gold Silver Rate Today)

(टीप – वरील बाबी ‘द पॉइंट नाऊ’ केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही. तसेच वरील दर हे सूचक असून, यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here