‘मला तुझी गरज नाही, तू मर जा’….. अन त्याने केली आत्महत्या

0
21

कल्याण प्रतिनिधी : प्रेम आंधळं असत अस म्हटलं जातं, भावनेच्या भरात काय करतो याच भान नसत. असच काही घडलं कल्याण मध्ये ‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ अस प्रेयसीने बोलताच एका तरुणाने भावनेच्या भरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्ह करून का आत्महत्या करत असल्याचं कारण सांगितलं हे सर्व बघून मित्र त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली . या भावनेच्या भरात त्याने आपली जीवनयात्रा संपवली मात्र त्याच्या घरचे मात्र आपल्या मुलाला कायमच मुकले आहेत.

आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव अंकुश पवार असे या तरुणाचं नाव असून तो कल्याण पश्चिम बेतुरकर पाडा येथील साईकृपा इमारतीमध्ये राहत होता. मूळचा जालन्याचा असलेला अंकुश चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात कल्याण आला होता. एका खाजगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून तो काम करत असतांना तरुणीशी प्रेमसंबंध जुळले मात्र काही कारणामुळे या दोघांमध्ये वाद झाले होते. याच रागातून प्रेयसीने  त्याला सुनावले त्यामुळे दुःखी झालेल्या अंकुशने गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास  काही मिनिटांत फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here