द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यात कोरोना संसर्ग कमी होत असल्यामुळे राज्यात पहीली ते चौथीच्या प्राथमिक शाळाही लवकरच सुरु करण्याबाबत वैद्यकीय कृती गटाने मान्यता दिल्याने त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिला आहे.
राज्यात कोरोनाच्या संख्येत घट होत असल्याने राज्यात पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू करून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुलांसाठी लसीकरण सुरू केला जाणार असून, 12 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. मात्र पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यावर प्रश्न आहेत. लहान मुलांच लसीकरण होई पर्यंत त्यांच्यावर कोरोना होण्याची भीती आहे.
पण मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी असून पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही. वैद्यकीय कृती गटाने काही अटी व नियम घालून आणि काटेकोर उपाययोजना करून प्राथमिक शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. गेल्या दीड वर्ष शाळा बंद असल्याने त्या सुरू करण्यासाठी पालकांचाही दबाव आहे . शाळा सूर नसल्याने मुलाचं भविष्य धोक्यात आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निर्णय होईल असे टोपे यांनी नमूद केले.
ऑनलाईन ( online ) लेक्चर मध्ये मुलांना लक्ष जास्त प्रमाणात लागत नाही. शाळा आणि ऑनलाईन ( online ) लेक्चर मध्ये खूप फरक असल्याने मुलांचं भविष्य धोक्यात आहे, असेही दिसून आलं आहे. त्यामुळे मुलं मोबाईलचा जास्त वापर करतात. आणि मोबाईल मुळे मुलांचा डोळ्यानवर त्याचा परिणाम होऊ शकतो. इतकंच नाही तर अभ्यास करण्यास मुलांना वैताग येतो. ऑनलाईन (online ) मुळे भैतिकज्ञान मंदावत चालला आहे. दहावीच्या मुलांच्याही शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
माञ अटी आणि शर्तीचे पालन करुन वर्ग भरवण्यात आले आहेत. कोरोणा होऊ नये म्हणुन योग्य काळजी घेउन मुलांना आपल्या जबाबदारीवर शाळेत पाठवावे असेही सांगण्यात आले होते. पालकांच्या भीतीमुळे विद्यार्थी संख्खा कमी पाहायला मिळत होती. मात्र आता योग्य प्रमाणत आहे. असेही सांगण्यात आली आहे. या संपूर्ण गोष्टींचा विचार करून शाळा पुन्हा सुरु करण्याचं निर्णय घेण्यात आलं आहे.
राज्यात स्टेडियम वर २५ टक्के तर नाट्य आणि चित्रपटगृहास ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारल्यावर निर्बंध अजून शिथिल होतील. मात्र बाजारपेठांमध्ये गर्दी असल्याने अजूनही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असेही राजेश टोपे यांच्या काढून सांगण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]