द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 25 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता नोएडा आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री आणि योगी आदित्यनाथ व केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विमानतळाच्या पायाभरणीचा पहिला टप्पा 2023-24 मध्ये पूर्ण होईल. हे आशियातील सर्वात मोठा आणि चौथ्या क्रमांकाचे विमानतळ असेल, असा योगी सरकारचा दावा आहे आणि हा विमानतळ प्रदूषणमुक्त असेल असाही दावा करण्यात आला आहे. या विमानतळामुळे 1 लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे
योगी आदित्यनाथ यांनी ( twiter) ट्विटर द्वारे ट्विट करून मोदींचे अभिनंदन व्यक्त केलं आहे.
( Twiter ) ट्विट द्वारे केलेलं ट्विट :
आदरणीय PM श्री @narendramodi जी द्वारा आज विश्व के चौथे सबसे बड़े इंटरनेशनल एयरपोर्ट, ‘नोएडा इंटरनेशनल एयरपोर्ट’ का शिलान्यास होगा।
यह एयरपोर्ट उ.प्र. को नई वैश्विक पहचान देगा।
उ.प्र., अब देश में सर्वाधिक 05 इंटरनेशनल एयरपोर्ट वाला राज्य होगा।
हार्दिक आभार प्रधानमंत्री जी!
जीवरा विमानतळ हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्ररातील औद्योगिक उपक्रम आणि सेवा क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनले, पहिला टप्पा 10,050 कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे.
6200 हेक्टरी मध्ये हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ असेल.
पहिल्या टप्प्यात 1334 हेक्टर मध्ये दोन धावपट्टी बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1.2 कोटी प्रवास करतील विमानतळावर मालवाहतुकीच्या सुविधे शिवाय एम आर ओ यंत्रणाही असणार आहे. असेही सांगण्यात आलं आहे.
हे हि वाचा :
राज्यात लवकरच पहिली आणि चौथीच्या शाळा भरणार !
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यात कोरोना संसर्ग कमी होत असल्यामुळे राज्यात पहीली ते चौथीच्या प्राथमिक शाळाही लवकरच सुरु करण्याबाबत वैद्यकीय कृती गटाने मान्यता दिल्याने त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिला आहे.
राज्यात कोरोनाच्या संख्येत घट होत असल्याने राज्यात पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू करून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुलांसाठी लसीकरण सुरू केला जाणार असून, 12 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. मात्र पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यावर प्रश्न आहेत. लहान मुलांच लसीकरण होई पर्यंत त्यांच्यावर कोरोना होण्याची भीती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम