Manoj Jarange | मुख्यमंत्री दुपारी दोन वाजता मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधणार आहेत. मनोज जरांगे यांच्या २० तारखेच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यात चर्चा होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री जरांगेंशी संवाद साधणार आहेत. आज मुंबईत एक महत्वाची बैठक पार पडणार असून या बैठकीत मनोज जरांगे पाटील जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असतानाच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहे.
Breaking News | मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…
२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण होणार असून शांतेत आंदोलन करायचं पण मराठा आंदोलन घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असा पुढील इशारा जरांगेंनी दिला असून सरकारला लाज वाटत नाही का? असा सवालही त्यांनी बीडच्या इशारा सभेत सरकारला केला होता. २० जानेवारीला मुंबईमधील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार असून आम्ही येतोय तुम्ही फट संडासाची सोय करा असा टोलाही जरांगेंनी लगावला. तसेच मुंबईत जाताना हिंसा करायची नाही असं आवाहनही करण्यात आलं.
Petrol Breaking | पेट्रोल-डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांना फटका
Manoj Jarange | कसा असणार जरांगेंंचा मुंबई दौरा ?
मराठा आरक्षणासाठी संपुर्ण राज्यातील मराठा बांधव एकत्र येत असून आता जरांगें यांच्या बीड मधील इशारा सभेत केलेल्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने लोक मुंबईत जातील असं चित्र दिसून येत आहे. तर या आंदोलकांची खाण्याची-राहण्याची कशी व्यवस्था असणार यावर देखील मनोज जरांगे यांनी उत्तर दिलेले आहे. “राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आम्ही घेऊन जात असलेल्या गाड्यांमध्ये करणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.
20 जानेवारी रोजी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांकडून काही ट्रॅक्टर चालकांना नोटीस देण्यात आलेल्या असताना यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्याने मुंबईकडे येणाऱ्या लोकांची आणखी संख्या वाढताना दिसत आहेत असा ठाम विश्वास जरांगेंनी मांडला आहे. आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम