Incognito mode | गुपचुप Incognito मोडवर सर्च करताय ?; मग ही बातमी वाचाच

0
24
Incognito mode
Incognito mode

Incognito mode |  इंटरनेटमुळे जग जवळ आले यामुळे जगत अशक्य असे काहीच राहिले नाही. मात्र, ह्या इंटेरनेटचा आणि तंत्रज्ञानाचा चांगल्या बाबींपेक्षा वाईट गोष्टींसाठीच जास्त उपयोग होतो.  त्यातच ब्राऊजरमधील ‘इनकॉग्निटो मोड’ हा युजर्सना प्रायव्हेट स्वरूपात इंटरनेट ब्राउजिंग करण्याचा अनुभव देतो.(Incognito mode)

पण, अनेकदा युजर्सची  इनकॉग्निटो मोड मधील ब्राउजिंग हिस्ट्री हीदेखील लीक होते.  त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की, तुम्ही इनकॉग्निटो मोडवर काही सर्च करताय आणि ते पूर्णपणे सेफ आहे, तर हा तुमचा गैरसमज आहे.  तुमच्या इनकॉग्निटो मोड वर सुद्धा कोणाचे लक्ष असू शकते. आजच अशा प्रकारे डिलीट करा इनकॉग्निटो मोडमधील ब्राउजिंग हिस्ट्री… (Incognito mode)

Info-Tech News | SIM कार्डसाठी आधार-पॅनची गरज नाही; १ जानेवारीपासून नियम बदलणार

‘इनकॉग्निटो मोड’ म्हणजे काय?|(Incognito mode)

इंटरनेटवर प्रायव्हसीची गरज लक्षात घेऊन गुगल क्रोमने सन २००८ मध्ये ‘इनकॉग्निटो मोड’ लॉंच केला होता. दरम्यान, तेव्हापासूनच इंटरनेटवरील ब्राउजिंग हिस्ट्री ही प्रायव्हेट ठेवण्यासाठी ह्या मोडचा वापर केला जातो. ह्याचा वापर विद्यार्थी, प्रोफेशनल्स आणि बिजनेस मध्ये देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.

क्रोम वरील इनकॉग्निटो मोड वापरणाऱ्यांची संख्या ही अनेक पटीने वाढत आहे. तसेच ह्या मोडमध्ये युजरची ब्राउजिंग हिस्ट्री, कुकीज, किंवा साइट डेटा तुमच्या डिवाइसवर साठवलीदेखील जात नाही. तसेच ह्या मोडमधील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ही ब्राऊजर हिस्ट्रीमध्येही दिसत नाही. सर्व वेबसाइट्सना तुम्ही नवीन युजर आहात असंच वाटतं. मात्र, असे सांगितले जात असले तरिही तुमची इनकॉग्निटो मोड वरील हिस्ट्रीदेखील डिवाइसमध्ये सेव्ह होत असते मात्र, ती फक्त सहजासहजी दिसत नाही.(Incognito mode)

Infotech news | थांबा..! एक QR Code Scan करताना ही काळजी घ्या, नाहीतर…

Incognito Modeची हिस्ट्री अशी करा डिलीट

इनकॉग्निटो मोड मधील हिस्ट्री ही डीवाईस मधून डिलीट करायची की नाही हे पूर्णपणे तुम्ही ठरवू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कम्प्युटर आणि मोबाइलमधील ब्राऊजिंग हिस्ट्री ही डिलीट करू शकता. मोबाइलवर इंटरनेटचा वापर हा अधिक वाढल्यामुळे ह्या ब्राऊजिंग हिस्ट्रीकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या कम्प्युटर किंवा फोनमधील  ब्राउजिंग हिस्ट्री ही पुढील प्रकारे डिलीट करा. (Incognito mode)

१. सगळ्यात आधी अँड्रॉइडवर ‘गुगल क्रोम ब्राऊजर’ हे ॲप्लिकेशन उघडा

२. युआरएलच्या जागी ‘chrome://net-internals/#dns’ हे टाका व एंटर करा.

३. त्यांनतर डावीकडे असलेल्या DNS ह्या ऑप्शन वर क्लिक करा व नंतर Clear host cache वर क्लिक करा. आणि अशाप्रकारे तुम्ही अँड्रॉइड फोनमधून क्रोमच्या इनकॉग्निटो मोड वरील सर्च हिस्ट्री ही करता येणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here