Thackeray Brothers | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळत असून, नेहमीच काहीतरी चढउतार हे सुरूच आहेत. दरम्यान, ज्यावेळी शिवसेनेत शिंदेंनी बंड केले आणि शिंदे गट हा सेनेतून वेगळा झाला. त्यावेळी अनेकांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नाही, पण आज एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या दरम्यान उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र आल्याचं दुर्मिळ चित्र बघायला मिळालं. राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात हे ठाकरे बंधु एकाच फ्रेममध्ये दिसले. दरम्यान, आज मुंबईत दादरमध्ये राज ठाकरेंच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ होता. दरम्यान, याच कौटुंबिक कार्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचे दिसले. (Thackeray Brothers)
Sudhakar Badgujar | सुधाभाऊंची आज ‘मोठी’ चौकशी; काय खुलासे होणार..?
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकावेळी आणि एकाच ठिकाणी उपस्थित राहणे म्हणजे दुर्मिळ योग आणि हा ‘ठाकरे योग’ आज जुळून आला. आणि ह्या भेटीचे निमित्त होते, राज ठाकरे यांच्या बहीण जयवंती व अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे याच्या साखरपुड्याचं. यश देशपांडे याच्या ह्या साखरपुडा समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब हे उपस्थित होतं. मुंबईमधील दादर परीसरातील एका सभागृहात हा समारंभ पार पडला. (Thackeray Brothers)
Pratap dada news: प्रतापदादांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी- भुसे
गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या मनातील इच्छा ह्या समारंभामुळे पूर्ण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या सर्वच राजकीय घडामोडी बघता आता ह्या दोन्ही दोन्ही भावांनी एकत्र यावं असा सूर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे आणि यासाठी राज्यात विविध ठिकाणी ठाकरे बंधूंचे बॅनर देखील लावण्यात आले होते. त्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर आजची भेट ही फार महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. (Thackeray Brothers)
भावांमध्ये चर्चा
अधिक माहितीनुसार, राज ठाकरे व उद्धव ठाकरे ह्या दोन्ही भावांमध्ये आजच्या ह्या कौटुंबिक कार्यक्रमात चर्चा देखील झाली. ह्या समारंभात दोन्ही भावांनी एकमेकांची विचारपूसही केली. तसेच, या समारंभात रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे ह्या दोघींचीही भेट झाली. त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मातोश्रींसोबतही संवाद साधला तसेच त्यांची विचारपूस देखील केली. गेल्या काही काळात राजकीय घडामोडींमुळे दुरावलेल्या ह्या भावांमध्ये जी दरी होती. ती आजच्या ह्या भेटीमुळे कुठेतरी दूर झाल्याचे दिसत आहे. (Thackeray Brothers)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम