Parliament | सचिवालयाची निलंबित खसदारांसाठी नवी नियमावली

0
53
Parliament
Parliament

Parliament |  संसदेचे हिवाळी अधवेशन हे सध्या सुरु असून, गेल्या दोन दिवसांत अधिवेशनाच्या काळात  या अधिवेशन काळात आतापर्यंत विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे. दरम्यान, या निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाकडून आता एक नोटीस जाहीर करण्यात आली असून, यात ह्या सर्व १४१ निलंबन करण्यात आलेल्या खासदारांना काही विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत.(Parliament)

दरम्यान, विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांवर निलंबनाचा सपाटा लावल्यानंतर कालपासून विरोधी पक्षाचे नेते हे आक्रमक झाल्याचे दिसत आहेत.त्यांनी कठोर शब्दात या संपूर्ण कारवाईचा निषेध केला आहे. दरम्यान, अशात आज सभागृहात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आज लोकसभा सचिवालयाकडून निलंबित खसदारांसाठी परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. (Parliament)

Parliament MP Suspended: लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेतील 45 खासदारही निलंबित, या अधिवेशनात आतापर्यंत 92 विरोधी खासदारांवर कारवाई

निलंबित खसदारांसाठीचे नियम

१. सर्व निलंबित १४१ खासदारांना लोकसभा किंवा राज्यसभेत प्रवेश नाही.

२. लॉबी किंवा गॅलरीतही या खासदारांना प्रवेश करता येणार नाही.

३. ह्या निलंबित खासदारांनी दिलेल्या नोटीस किंवा ठरावाच्या सूचना ग्राह्य धरलया जाणार नाही.

४. ह्या खासदारांच्या निलंबनाच्या काळात होणाऱ्या समितींच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार ह्यांना नसेल.

५. निलंबित खासदार हे ज्या समितीचे सदस्य असतील. त्या समितीच्या बैठकांना हजर राहण्याचाही अधिकार नाही.

६. दैनिक भत्त्यांनाही निलंबित खासदार पात्र नसतील.

अशा वरील नियमांचा समावेश हा ह्या जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात केलेला आहे.

Parliament Winter Session | अधीर रंजन चौधरीसह विरोधी पक्षाचे 33 खासदार निलंबित

इतक्या खासदारांचं निलंबन?

आजपर्यंतच्या संसदेच्या इतिहासात अशी घटना कधीही घडली नव्हती जी ह्या दोन दिवसांत घडली आहे. गेल्या दोन दिवसांत सलग विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, कालपर्यंत एकूण १४१ विरोधीपक्षाच्या खासदारांना निलंबित केलेलं आहे.

लोकसभेच्या (Parliament) ९५ तर, राज्यसभेच्या ४६ खासदारांचे असे एकूण १४१ निलंबन करण्यात आलेलं आहे. काल दिवसभरात ४९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक वेळा संसदरत्न ठरलेल्या खासदार सुप्रिया सुळे तसेच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचादेखील समावेश आहे. दरम्यान, ह्या तडकाफडकी कारवाईचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत आहे.

नेमकं निलंबनाचं का?

ह्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्षाच्या १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या १३ डिसेंबर रोजी संसद परिसरात काही जणांनी प्रेक्षक गॅलरीतून दोन तरूणांनी खाली सभागृहात उड्या मारल्या. आणि सभागृहासह संसद(Parliament) परिसरात स्मोक कँडेल फोडत तसेच घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याची घटना घडली होती. दरम्यान, यामुळे संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच याबाबत सरकारने व गृहमंत्र्यांनी त्यांची भूमिका मांडावी व याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी लाऊन धरल्याने ह्या विरोधी पक्षाच्या १४१ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here