Gold Silver Price | ह्या आठवढ्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदिने दारवाढीची सलामी दिली असून, ह्या आठवड्याची सुरुवातच दारवाढीने झाली आहे. दरम्यान, रविवार पासूनच सोने-चांदीच्या दरांची (Gold Silver Price) आगेकूच सुरु आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत हे दारवाढीचे सत्र सुरू झाले होते आणि ते आता ह्या आठवड्यातही कायम आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडींमुळे हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणानुसार, जगातील बडे गुंतवणूकदार हे त्यांचे धोरण बदलवण्याची शक्यत असून, त्याचा परिणाम हा ह्या सोने-चांदीच्या दरांवर दिसून येतो. ह्या महिन्यात सोने-चांदी ह्या दोन्ही मौल्यवान धातूंनी यावर्षीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत नवीन रेकॉर्ड तयार केले आहेत. दरम्यान, ह्या आठवड्यात सोने-चांदीचे भाव वाढले असून, असे आहेत आजचे दर…(Gold Silver Price)
New Mobile | नविन वर्षात फोन घेताय तर ‘या’ फोनवर मिळतोय १७ हजारांचा जबरदस्त डिस्काउंट
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव..?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोने चांदीच्या दरांमध्ये दारवाढीचे सत्र हे सुरू असून, असे आहेत प्रत्येक कॅरेट प्रमाणे सोन्याचे दर… सोन्याच्या किंमतींत आज तब्बल २०० रुपयांनी वाढ झाली असून, त्यापाठोपाठ चांदीच्या किंमतीतही ७५ रुपयांनी वाढ झाली आहे. दारमेण, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर हे ६२,०८४ रुपये असे आहे तर, २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोनेचे दर ६१,८३६ रुपये असे आहेत. तसेच, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ५६,८६८ रुपये झाले आहे. तर, १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम ४६,५६३ रुपयांवर पोहोचले आहे. १४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ३६,३१९ रुपयांवर पोहचले आहे. तसेच, एक किलो चांदीचे आजचे दर हे ७३,६५२ रुपये झाले आहेत.(Gold Silver Price)
Gold Silver Rate | सोने-चांदीची दरवाढीची सलामी; असे आहेत आजचे दर..?
चांदीच्या किंमतीत इतकी वाढ
ह्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीच्या किंमतीत तब्बल ३०० रुपयांनी वाढ झाली होती. तसेच मागील आठवड्यात चांदीच्या किंमतींनी ३,५०० रुपयांनी उसळी घेतलेली होती. तर, १६ डिसेंबर रोजी चांदीच्या किंमतीत ८०० रुपयांनी घसरण झाली. १८ डिसेंबर रोजी चांदीत पुन्हा ३०० रुपयांची दरवाढ झाली. तसेच, १९ डिसेंबर रोजी चांदीच्या किंमतीत ५०० रुपयांनी घसरण झाली होती. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा दर हा ७७,५०० रुपये असा आहे.(Gold Silver Price)
(वरील सोन्याचे दर हे सूचक असून, त्यात इतर करांचा समावेश नाही. तसेच अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम