द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: पेट्रोल दर वाढी मध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. मात्र याचा चांगलाच फटका वाहन क्षेत्राला बसला आहे. पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांना महागाईचाही फटका बसला. आणि त्यामुळेच दुचाकीचा कमी खप होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसं पासून मोदी सरकारने पेट्रोलच्या दरांच्या किंमतीत सातत्याने वाढ केली आहे. याचा फटका सर्वसामान्याणच्या खिशावर बसलाच आहे. पण देशाच्या अर्थव्यवस्थेला याचे चटके बसतात.
चालू आर्थिक वर्षात दुचाकींचा खप 1 ते 4 टक्क्यांनी कमी झालेला असेल असा अंदाज ICRA या संस्थेने वर्तविला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यास पुंन्हा लोक दुचाकी कडे वळतील. आणि विक्री करणाऱ्या कंपन्याना उभारी मिळेल. अस मत तज्ज्ञांनी वक्त केलं आहे.
दुचाकी ( TwoWheeler) खपाची प्रमुख कारणे:
- दुचाकींचा किमतींमध्ये लक्षणीय वाढ. त्यात भर म्हणजे 110 च्या घरात पोचलेला पेट्रोल.
- अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातुन कमी मागणी.
- अनेक महिने शाळा कॉलेज बंद असल्याचे परिणाम.
- वर्क फ्रॉम होमला मुदत वाढ मिळाली.
- अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात किंवा पगारात कपात झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] का घटला दुचाकीचा खप ? […]