द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; काँग्रेस (Congress) अन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांना फारच मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बँक मध्यवर्ती निवडणुकांत दोन्ही पक्षांच्या दिग्गजांना हा धक्का बसलाय.
सध्या स्थानिक स्तरावर च्या निवडणुकांचं (Elections) वारं वाहत आहे.
यातच सातारा (Satara), सांगली (Sangali) येथील मध्यवर्ती सहकारी बँक (Bank) निवडणुकां मध्ये काँग्रेस अन राष्ट्रवादी काँग्रेस ला पराभवाची चव चाखावी लागली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे दिग्गज या निवडणुकांमध्ये पराभूत (Defeated) झाले आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री (Minister) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) पराभूत झाले आहेत.
त्यांचा सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsinh Patankar) यांनी पराभव केला.
तर सांगली जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस चे विद्यमान आमदार (MLA) विक्रम सावंत (Vikram Sawant) यांचा, भाजप चे प्रकाश जमदाडे (Prakash Jamdade) यांनी पराभव केला आहे.
विक्रम सावंत हे राज्य मंत्री मंडळातील मंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचे मावस भाऊ आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे.
शशिकांत शिंदे यांना आपला पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय.
शिंदे यांच्या पराभवा नंतर, त्यांच्या समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयावर दगड फेक केली असल्याचं सांगण्यात येतय.
आपल्या पराभवामागे मोठे षडयंत्र आहे. आपण गाफील राहिलो, म्हणूनच आपला पराभव झाला. असं पराभूत आमदार शशिकांत शिंदे यांचं म्हणणं आहे.
साताऱ्यात 21 जागांसाठी ही जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक होत आहे. ज्यात आधीच 10 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चा झालेला हा पराभव मोठा धक्का आहे.
त्यात या दोनही पक्षांचे दिग्गज या निवडणुकां मध्ये पराभूत झाल्याने, दोन्ही पक्षांसाठी हा मोठा धक्का आहे.
सध्या महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणावर तापलेले आहे. ज्यात महाविकास आघाडी सरकार बाबत, काही बाबतीत नाराजी आहे.
याचाच परिणाम या मध्यवर्ती बँक निवडणुकां मध्ये दिसून आला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला हा पराभव खूपच मानहानीकारक आहे. कारण, यात दोन्ही पक्षांचे दिग्गज पराभूत झाल्याने, एक प्रकारे दोन्ही पक्षांसाठी ही आगामी निवडणुकां साठी धोक्याची घंटा आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
काँग्रेस अन राष्ट्रवादी काँग्रेस च्या या पराभवा नंतर वरिष्ठ स्तरावरून काय प्रतिक्रिया उमटणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम