Jalna | आंतरवाली सराटीत आजपासून ओबीसींचे उपोषण

0
32

Jalna |  गेल्या काही दिवसांत जालना(Jalna)  जिल्ह्यातील आंतरवाली सराटी हे गाव मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मोठे चर्चेत आले आहे. दरम्यान, आता या आंतरवाली सराटी गावालगत असलेल्या आंतरवाली सराटी ह्या फाट्यावर आजपासून ओबीसी समाजाचेदेखील साखळी उपोषण सुरु होणार आहे. मराठा आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेली न्यायमूर्ती शिंदे समिती ही तातडीने रद्द करण्याच्या मागणीसह प्रलंबित इतर मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे आंतरवाली सराटी ह्या फाट्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

मराठा आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती शिंदे समिती ही रद्द करावी. मराठा समाजाला आतापर्यंत वाटण्यात आलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे तातडीने रद्द करावीत. जातीनिहाय जणगणना लवकरात लवकर करण्यात यावी. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. ह्या आणि अशा अनेक मागण्यासांठी वडीगोद्री येथील आंतरवाली सराटी फाटा याठिकाणी आजपासून ओबीसी समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे.(Jalna)

Maharashtra | महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या; बेरोजगारी मोठे कारण

याबाबत जालना जिल्ह्यातील समस्त ओबीसी समाजबांधवांनी सोमवारी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन देखील सादर केले आहे. ज्यात, मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. तर मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये तसेच याकाळात वाटण्यात आलेले सर्व कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

एकीकडे मराठा आरक्षणाचा केंद्र बनलेल्या आंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाच्या वतीने सरसकट ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरु असून, स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे.

दरम्यान, आता दुसरीकडे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. यासह इतर मागण्यासांठी आंतरवाली सराटी फाटा म्हणजेच वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे देखील साखळी उपोषण सुरू होत आहे. यामुळे राज्य सरकार आता ही दोन्ही आंदोलन कसे हाताळणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. तर, याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे.(Jalna)

Gold Silver Rate | सोने-चांदीची विक्रमी घोडदौड; असा आहे आजचा दर

ओबीसी बांधवही आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या गावात उपोषण सुरु केल्याने जालना जिल्हा आता मोठ्या चर्चेत आला होता. त्यात जालना शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेली जाळपोळ व दगडफेकीच्या मोठ्या घटना देखील घडल्या होत्या. असे असतानाच मनोज जरांगे पाटील आणि छग  न भुजबळ असा वाद यातून पुढे आला होता.

तसेच, ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी समाजाकडून होऊ लागली आहे. याचवेळी छगन भुजबळ यांनी आंतरवाली सराटी जवळच्याच एका गावात ओबीसीची भव्य सभा घेतली होती. त्यानंतर आता आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी समाजातर्फे साखळी उपोषण सुरु होणार आहे. त्यामुळे जालन्यात आपल्या मागण्यासाठी ओबीसी समाजदेखील आक्रमक होत असल्याचे बघायला मिळत आहे.(Jalna)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here