Political News | ‘महादेवा मला मंत्री करा…’; शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याचं साकडं

0
31

Political News | “महादेवा मला मंत्री करा, सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी”, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केलेली आहे. हडपसर हांडेवाडी रोड श्रीरामाचा पूर्णाकृती मूर्तीच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेनेचे भरत गोगावलेंनी इच्छा व्यक्त केला आहे “अजून मंत्री झालो नाही पण आता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झालेले आहे. मला असे वाटते मी मंत्री होईल अशी आशा असून येथील महंमदवाडीचे आता महादेववाडी नामकरणही होणार आहे. त्यामुळे हे महादेवा मला मंत्री करा तसेच सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी”, असं म्हणत गोगावलेंनी महादेवाकडे मंत्रीपदासाठी साकडं घातलेलं आहे. (Political News)

Travel Update | फिरायला जायचंय! ‘हे’ सुंदर ठिकाण पर्वतांची राणी म्हणून ओळखले जाते

मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार कधी?

राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कधी होणार? हा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारत वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांना आपल्यासोबत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. एकनाथ शिंदे स्वत: या नव्या सरकारचे मुख्यमंत्री झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गोटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदाची पहिल्या दिवसापासून आशा होती आणि त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांची इच्छा अद्यापही पूर्ण झालेली नाही. यामध्ये भरत गोगावले यांचादेखील समावेश आहे.

Cars Offer | लक्झरी सेडान कारवर मिळतेय लाखोंची बंपर सूट; कसा घ्याल लाभ?

भरत गोगावले यांनी यापूर्वीदेखील अनेकदा मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवलेली आहे. काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्ताराची चर्चा अंतिम टप्प्यावर आल्याची माहिती समोर आलेली होती. मंत्रिमंडळाचा शंभर टक्के विस्तार होईल, असं सांगितलं जातं होतं मात्र अचानक ऐनवेळी राजकारणातले फासे पलटले गेले. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांच्या भल्यामोठा गटासह पक्षात सहभागी झाले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नवे मंत्री बनले. शिवसेनेच्या आमदारांसाठी होणारा विस्तार मात्र झाला नाही. भरत गोगावले यांनी आता पुन्हा मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याने राजकारणात अजून बरंच काही घडायचं राहिलं आहे, असे संकेत मिळता आहेत.(Political News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here