विकी गवळी – प्रतिनिधि: चांदवड – अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेला आहे. या नुकसानग्रस्त भागाची अनेक नेते पहिनी करत आहेत. यातच नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा केंद्रीय मंत्र्यांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.(Breaking)
Dada Bhuse | चुकीचं वक्तव्य केलं तर…; भुसेंचा राऊतांना इशारा
केंद्रीय मंत्र्यांसमोर खराब झालेला कांदा दाखवत एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असतांना शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
Crime news | शेजारचं दुकान भाड्याने घेतलं, भिंत फोडत ज्वेलरचं दुकान लुटलं
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील ही संपूर्ण घटना आहे. रामदास लक्ष्मण केदारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे हातात काहीच शिल्लक न राहिल्याने शेतकरी व्यथित झालेले आहेत. शेतात काहीच शिल्लक न राहिल्याने मंत्री भारती पवार यांच्यासमोर चांदवडमधील शेतकऱ्यांनी व्यथा मांडलेल्या आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम