Big News | सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

0
23

Big News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेली आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी, सर्वसामान्य नागरी, शिक्षण, उद्योग क्षेत्राशी संबंधित काही अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Nashik | बिजोरसे-नामपूर रस्त्यासाठी सव्वा कोटी मंजूर; रस्त्याचे काम सुरू

राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही भागात शेतीचं प्रचंड नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पावसाची झळ बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पावलं उचललेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झालेली आहे. यावेळी सरकारने अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणं, आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच राज्य सरकाने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाहीये. शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाला सर्व मंत्र्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Satara | वडिलांना लेकीचा अनोखा सलाम; रिक्षातून आणले स्वतःच्या लग्नाचे वऱ्हाड

 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले?

  1. अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार (मदत व पुनर्वसन)
  2. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा (गृहनिर्माण विभाग )
  3. राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा (शालेय शिक्षण)
  4. मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार (मराठी भाषा विभाग)
  5. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली (अल्पसंख्याक विभाग )
  6. औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन (उद्योग विभाग )
  7. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार (महसूल विभाग)
  8. शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा (महसूल विभाग)

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here