Maratha reservation | मनोज जरांगेंनी भुजबळांना नाशकातच घेरले!

0
23

Maratha reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार पुकारून आर अथवा पारची लढाई सुरु केलेल्या व सध्या राज्य दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आज नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांच्या वर सणसणीत टिकास्त्र सोडले.  २४ डिसेंबरआधी सर्व मराठ्यांना ओबीसीटतून आरक्षण मिळणार, आरक्षणाचा मुद्दा हा अंतिम टप्प्यात असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.

तुमच्या कॉलेजला सावित्रीबाईंचं नाव का नाही? 

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करून छगन भुजबळ यांनी टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नाशिकमध्येच भुजबळांचा चांगला खरपूस समाचार घेतला आहे.

पुढे ते म्हणाले की, म्हाताऱ्या माणसाने आता एवढ जास्त बोलू नये, शरीरातील पाणी कमी पडू शकतं. आता नाही, एकदा आरक्षण मिळू द्या, मग बघतो. यांचं आपल्याला सगळं माहिती आहे. आता आड येऊ नको. तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाईंचे नाव का नाहीये? असा सवाल करत त्यांनी भुजबळांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरले आहे.

Nashik News | नाशिक जिल्ह्यात १९ जानेवारीपर्यंत जमावबंदी

हे जातीयवाद पसरवत आहेत

त्यांनी सांगितले आहे की, मराठे दंड थोपटल्याशिवाय राहणार नाही. सरकारला सांगतोय यांना आवरा. हे जातीयवाद पसरवत आहेत. नाही, तर मग आता मी पण मागे हटणार नाही. सरकारला विनंती करतोय ते जातीय तेढ निर्माण करत आहेत त्यांना तुम्ही रोखा.

आम्ही शांततेत जात आहोत, शांतता राखण्याचं काम हे सरकारचं आहे. पण हे सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे. आम्ही शांततेचं आवाहन करतोय.

मी आरक्षण यांच्या छताडावर बसून घेतो

पोलीस भरती करायची असेल तर, आमची जागा सोडा, महाराष्ट्रातील आमच्यावर दाखल गुन्हे मागे घ्या, आरक्षण दिले नाही तर कोटीने मराठे आंदोलनाला सज्ज आहेत. ह्या नाशिकच्या पवित्र भूमीतून मी आवाहन करतोय, सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी मराठा लेकरांच्या पाठीशी उभे रहावे, नाहीतर तुम्हाला हे लक्षात ठेवतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मला सगळेच शत्रू मानतात, पण मी त्यांना घाबरत नाही.

फक्त तुम्ही शांत रहा, मी छताडावर बसून आरक्षण घेतो, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. मंगळवारी ठाण्यातील सभेत जरंगे-पाटील म्हणाले होते की, आतापर्यंत आपण भुजबळ यांना वैयक्तिक लक्ष्य केले नव्हते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याने आता मी त्यांना विरोध करणार आहे, असे ते म्हणाले. गेल्या आठवड्यात अंबड येथे झालेल्या सभेत भुजबळांनी जरांगे-पाटील यांच्यावर टीका केल्याने सकल मराठा समाज संतप्त झालेला आहे.

Breaking news | अंकुश शिंदेंची तडकाफडकी बदली; संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here