Ahmednagar | मराठा – ओबीसींमध्ये आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष हा आता गावपातळीपर्यंत पोहचला आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात याप्रकरणी दोन घटना उघडकीस आल्या आहे आणि या दोन्ही घटनांमध्ये महिलांचा समावेश आहे.
शेंडी गाव (ता. नगर) येथील या सरपंच महिलेने गावातील एका सोशल मीडिया ग्रूपमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी घाणेरडी कॉमेंट केली होती. दरम्यान, या महिला सरपंचाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरी घटना ही कुकाणे (ता. नेवासा) येथील असून, येथील एका महिलेने मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देणारा, टीका करतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित केला होता. नंतर याच महिलेने दुसरा व्हिडिओ प्रसारित करत याप्रकरणी माफीही मागितली आहे.
Weather Update | थंडी कमी होणार पण पिकांवर दुष्परिणाम वाढणार..?
दरम्यान, या प्रकरणांमुळे शेंडी या गावात रविवारी सकाळपासून तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. गावातील सर्व व्यवहार हे बंद ठेवण्यात आलेले आहेत. गावातील तसेच नगर शहर आणि आसपासच्या गावांतून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे या शेंडी गावात एकत्र जमत आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शेंडी गावात बंदोबस्त वाढवला आहे. नगर जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे, याची माहितीदेखील कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे.
Maratha Reservation | भुजबळांविरोधात मराठे पेटले; कुठे ‘जोडे मारो’, तर कुठे पुतळे जाळले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम