UGC Net Exam | युजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर

0
43

UGC Net Exam | पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता चाचणी अर्थात UGC Net Exam चे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध जाहिर करण्यात आलेले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत 06 ते 14 डिसेंबर या कालावधी ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी जून 2023 मध्ये ही परीक्षा घेण्यात आलेली होती.

पोटच्या लेकीसाठी बापच ठरला हैवान! वारंवार बलात्कार अन् मारहाण; अखेर मुलीचा मृत्यू

NTA कडून परीक्षेसाठीचे केंद्र निश्चित केलेल्या शहरांची माहिती परीक्षेच्या दहा दिवस आधी प्रसिध्द केली जाणार आहे. www.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षेविषयी अद्ययावत माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ‘NTA’कडून करण्यात आलेले आहे. वेळापत्रकानुसार सहा डिसेंबर रोजी दोन सत्रांमध्ये परीक्षा होईल.

onion news | विंचूरची कांदा लिलावात ऐतिहासिक नोंद; लासलगाव बाजार समितीला टाकले मागे

  • पहिल्या सत्रात इंग्रजी, हिंदू स्टडीज, कोकणी आणि इतर काही परिकीय भाषांची परीक्षा असेल.
  • तर दुसऱ्या सत्रात इतिहास, मणिपुरी, जर्मन, सिंधी या विषयांच्या परीक्षा असतील.
  • वाणिज्य विषयाची परीक्षा सात डिसेंबरला पहिल्या सत्रात तर शारीरिक शिक्षण, भारतीय संस्कृती, संगीत, फ्रेंच, संगणकशास्त्र आदी विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रात नियोजित आहेत.

अशाचप्रकारे दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here