sbi recruitment | सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय स्टेट बँकेत तब्बल ८,२८३ पदांसाठी बंपर भरती निघाली असून, यासाठीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. ही भरती लिपिक या पदासाठी होणार आहे.
दरम्यान, यासाठी इच्छुक उमेदवारांनी SBI ची अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी. आज म्हणजेच १७ नोव्हेंबर पासून यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ७ डिसेंबर २०२३ ही आहे.
याठिकाणी एकूण ८,२३८ जागा उपलब्ध असून यामध्ये ३,५१५ सामान्यांसाठी, १२८४ अनुसूचित जातींसाठी, ७४८ अनुसूचित जमातीसाठी, १,९१९ OBC साठी तर ८१७ EWS साठी राखीव असणार आहेत.
विराट कोहली घालतो 18 नंबरचीच जर्सी; कारण ऐकून तुम्हीही भावूक व्हाल
कसा कराल अर्ज –
पदाचे नाव – ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट व सेल्स)
शैक्षणिक पात्रता –
पदवी उत्तीर्ण उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच, जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत तेही अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. याशिवाय उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षे इतके असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत असणार आहे.
अर्ज फी
या भरतीसाठी उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी ७५० रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यासाठी सूट देण्यात आली आहे.
पगार
सुरुवातीचे मूळ वेतन हे रु. १९,९००/- असे आहे. (रु.१७,९००/- तसेच पदवीधरांना दोन आगाऊ वाढीव स्वीकार्य आहे)
कशी असेल निवड प्रक्रिया ?
या पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही विविध टप्प्यात होणाऱ्या परीक्षेवर आधारित असणार आहे. या अंतर्गत जानेवारी, २०२४ मध्ये लेखी स्वरुपातील परीक्षा होऊ शकते. तर मुख्य परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. अधिक माहितीसाठी sbi च्या अधिकृत साइटला भेट द्या.
भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी खुद्द पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम