विराट कोहली घालतो 18 नंबरचीच जर्सी; कारण ऐकून तुम्हीही भावूक व्हाल

0
38

विराट कोहली | बुधवारी (दि. 15)रोजी भारताने फायनलमध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी भारतासोबत फायनलमध्ये भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. यापुर्वी विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावलेलं होतं. तसेच विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 50 वं शतकदेखील सेमीफायनलच्या सामन्यात न्युझीलंड विरुद्ध खेळताना पुर्ण झालेलं आहे. या शतकासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलं आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 49 शतकं आहेत.  आता विराटच्या नवावर 50 शतकं झालेली आहे. या सगळ्यादरम्यान विराट कोहलीची जर्सी देखील त्याच्यासाठी लकी ठरत असल्यातं म्हटलं जात आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी खुद्द पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता

 

विराट का घालतो 18 नंबरचीच जर्सी?

सध्या विराट कोहलीबाबतच्या अनेक गोष्टी इंटरनेटवर सर्च होत आहेत. यात विराटचा स्कोअर, आयुष्य, लव्ह लाईफ, नेट वर्थ इत्यादींबद्दल महिती घेतली जाते आहे. त्याच्या जर्सीबद्दल देखील अनेक लोकांना उत्सुकता आहे.  खेळाडूंच्या जर्सीवर एक नंबर लिहिलेला असतो, जो कधी त्यांचा लकी नंबर तरी असतो किंवा जन्मतारीख असते. पण 18 हा कोहलीचा लकी नंबर नाही किंवा जन्मतारीख देखील नाही. कोहलीचा लकी नंबर 9 आहे आणि त्याची जन्मतारीख 5 आहे. यानंतरदेखील तो 18 नंबरची जर्सी घालतो. याचं कारण जाणून घेतल्यावर तुम्हीदेखील भावूक व्हाल.

या कारणामुळे विराट घालतो 18 नंबरची जर्सी…

विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली अंडर-19 विश्वचषक जिंकला तेव्हा त्याने 18 क्रमांकाची जर्सी घातलेली होती. 18 डिसेंबर 2006 रोजी कोहलीच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनाच्या दिवशी विराट रणजी सामना खेळत होता. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावं, असं त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. म्हणून, जेव्हा विराटने 2008 मध्ये भारतासाठी पदार्पण केलं तेव्हा तो नेहमी त्याच्या वडिलांच्या प्रेमामुळे आणि स्मरणार्थ या नंबरची जर्सी घालतो, जे त्याच्यासाठी लकी देखील आहे. विराट कोहलीच्या मते, हा आकडा त्याला त्याच्या वडिलांच्या जवळचा वाटतो.

Nashik news | नाशकात एकाच परिसरात ४ बिबट्यांचा मुक्तसंचार

हिंदू धर्मात 18 क्रमांकाचं महत्त्व

  1. हिंदू धर्मात 18 क्रमांकाचं विशेष महत्त्व मानलं जातं. कारण धर्माशी संबंधित एकूण सिद्धींची संख्या (अनिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या, महिमा, सिद्धी, इशित्व किंवा वशित्व, सर्वकामवास्यता, सर्वज्ञ, द्वार-श्रवण, सृष्टी, परकायप्रवेशण, वाकसिद्धी, कल्पवृक्षत्व, संहारकारनायत्व, संहारकत्व, संहारकत्व, सृष्टी, श्रवण) देखील 18 आहे.
  2. हिंदू धर्माच्या ज्ञानाचे देखील 18 प्रकार आहेत. (छ वेदांग, चार वेद, पुराण, मीमांसा, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, धनुर्वेद आणि गंधर्ववेद)
  3. 18 प्रकारचे पीरियड्स देखील आहेत. ज्यात एक वर्ष, पाच ऋतू आणि 12 महिने समाविष्ट आहेत.
  4. श्रीकृष्णाच्या नात्यालाही 18 गुण आहेत. भगवतगीतेत 118 अध्याय आहेत आणि ज्ञानसागरातही 18 हजार श्लोक आहेत.
  5. माता भगवतीचीही 18 रूपं आणि 18 हात आहेत.  माता भगवतीची 18 रूपं आहेत – काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, त्रिपुरभैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी, कुष्मांडा, कात्यायनी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, गायत्री, पार्वती, श्रीराधा, सिद्धिदात्री आणि भगवती.

(टीप : वरील सर्व बाबी द पॉंईट नाऊ केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आहे. यात द पॉंईट नाऊ कोणताही दावा करत नाही.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here