OBC Sabha | मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज जालन्यातील अंबड येथे भव्य ओबीसी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्यातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर असणार आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची या सभेला प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या सभेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याशिवाय राज्यातील महत्वाचे ओबीसी नेते देखील या सभेसाठी उपस्थित राहणार आहे.
या आहेत मागण्या
१. ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करु नये.
२. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी.
३. मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी.
४. खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी.
५. ७ सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर रद्द करावा.
६. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखल्यांचे वाटप करावे.
७. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी.
धक्कादायक! औषधातून पत्नीला दिले ब्लेडचे तुकडे
जरांगेंच्या बालेकिल्ल्यात भुजबळांची सभा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात ही जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावातून झाली होती. आता ओबीसींची सभा देखील ह्या जालना जिल्ह्यातच होत आहे. विशेष म्हणजे आंतरवाली सराटी गावापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर ही सभा पार पडत आहे. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्याच बालेकिल्ल्यात सभा घेऊन, मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास आमचा कडकडून विरोध असल्याचा संदेश ओबीसींकडून देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
मराठा आरक्षणाला विरोध…
राज्यातील सर्वच मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. पण, त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते विरोध करीत आहेत. दरम्यान, आता हाच विरोध दर्शवण्यासाठी आज अंबड येथे ओबीसींची जाहीर सभा होत आहे. या सभेला राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांचीही हजेरी असणार आहे. तसेच, आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाला या ओबीसी नेत्यांकडून विरोध होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
या नेत्यांची उपस्थिती?
या सभेला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजप नेत्या पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, शिवाजीराव चोथे यांसह ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आदी नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
‘Bajaj CNG Bike’ ची पहिली झलक; दुचाकी झाली कॅमेऱ्यात कैद
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम