कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केलेली आहे.
Maratha reservation | सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड करू नये- जरांगे पाटील
‘मराठा समाजावर प्रेम असेल तर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करावी. त्यानंतरदेखील महापूजेसाठी येणार असाल तर मराठा समाज काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. बीड आणि जालना जिल्ह्यातील आमदारांचे काय काय झाले आहे? तुम्ही पाहिलं असेल. तुम्हाला डेंग्यू झालेला आहे. त्यामुळे पंढरपूरला येण्याचे धाडस करू नये. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पंढरपूरच काय राज्यात कुठेही फिरू देणार नाही’, असा इशारा गायकवाड यांनी अजित पवार यांना उद्देशून दिलेला आहे.
तर कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘कार्तिकी पूजा मी करावी हे ऐकून मी भरून पावलो, मला बोलले हेच खूप झालं’, असं जरांगे पाटील म्हणालेत. समाजाची भावना आणि देवस्थानाची भावना याचरणी मी नतमस्तक होतो. मला दर्शन झाल्यासारखं झालेलं आहे. मी आताच भरून पावलो असंही मनोज जरांगे पाटील पुढे म्हणालेत.
Diwali 2023 | धनत्रयोदशीला सोनं खरेदी का करावं?
तर आग्रह जास्तच वाढला तर जाणार का? या पत्रकांराच्या प्रश्नावर जरांगे म्हणाले, मला आत्ताच पुजा झाल्यासारखं वाटलं, मला याचंच समाधान वाटलं. ते म्हणाले तेच खूप झालं, आपल्याला तशी काही अपेक्षा नाही असंही मनोज जरांगे पुढे म्हणाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम