Educational | विद्यार्थ्यांना मिळणार अंडा पुलाव, बिर्याणी आणि केळी

0
24

 Educational | राज्यात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात आता दर आठवड्यातून एकदा अंडी व केळीचा  समावेश करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस व पौष्टिक आहार देण्यावर  शालेय शिक्षण विभागाने विशेष लक्ष दिले आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेनुसार, विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहाराच्या व्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस आता अंडी देण्यात येणार आहेत. शिवाय, जे विद्यार्थी शाकाहारी आहेत आणि अंडी खात नाहीत. त्यांना आठवड्यातून एकदा केळी दिली जाणार आहे. या निर्णयानुसार, शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे किंवा अंडा पुलाव आणि बिर्याणी अशा स्वरूपात हा आहार देण्यात येणार आहे.

Bharat aata | मोदी सरकारची नवी भेट, सर्वसामान्यांसाठी ‘भारत आटा’ लॉन्च

अंडी न खाणाऱ्यांसाठी केळी  

जे विद्यार्थी शाकाहारी आहेत आणि अंडी खात नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी अंड्याऐवजी केळी किंवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळे दिली जातील. हा उपक्रम २३ आठवड्यांकरिता सुरू असणार आहे. सद्यस्थितीत अंड्याचा बाजारातील भाव विचारात घेता एका अंड्यासाठी ५ रुपये दर सरकारतर्फे निश्चित करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीतर्फे तसेच शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या, आहार शिजवणाऱ्या यंत्रणेतर्फे हा उपक्रम राबविण्याच्या सूचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या उपक्रमाच्या अंतर्गत नियमित दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्यामुळे अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

MPSC 2023 | सरकारी खात्यात ३०३ पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

राज्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी राज्याचे आरोग्य विभाग अत्यंत प्रयत्नशील आहे. शालेय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून राज्यातील बालकांना मोफत पोषण आहार दिला जातो. ही योजना सुरू करण्यामागे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणे व त्यांना चांगले शिक्षण आणि पोषण देणे. हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत शाळांमध्ये प्राथमिक वर्गांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून पोषण आहारासोबत अंडी व केली देण्यात येणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here