आमदार महेश शिंदे यांचे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बहुतांशी ग्रामपंचायतवर वर्चस्व

0
20

महेश क्षीरसागर- प्रतिनिधी : सातारा | कोरेगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सरासरी 85 टक्के मतदान झालेले आहे.

Crime News | आईचा डोळा लागला आणि १० महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू

कोरेगाव तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीपैकी बोरिव, कन्हेर खेड, चोरगेवाडी, बोबडेवाडी, मुगाव, शिरढोण या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडलेल्या आहेत. यापैकी बोबडेवाडी, शिरढोण या ग्रामपंचायती आमदार महेश शिंदे यांच्या ताब्यात गेल्याचं पहायला मिळालं. तर कनेर खेडची महत्त्वाची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे.

Gram Panchayat Elections Result | ठरलं तर मग..! बघा जिल्ह्यात कुठे कोणाचा गुलाल

कोरेगाव तालुक्यातील तडवळे, आसरे, भाटमवाडी ,चांदवडी, वेलंग आणि चौणेश्वर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलेले आहे. सोमवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी कोरेगाव तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोरेगाव विधानसभा मतदार संघातील तडवळे, भाटमवाडी, बुध, पुसेगाव, शिरढोण, काटेवाडी, नवलेवाडी, मुगाव, बोबडेवाडी या ग्रामपंचायतीमध्ये आमदार महेश दादा शिंदे यांच्या गटाने विजय संपादन केलेला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here