चांदवड तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे दुष्काळी मोर्चा; शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

0
21

विकी गवळी-प्रतिनिधी : चांदवड | तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे दुष्काळी मोर्चा काढण्यात आलेला आहे. चांदवड तालुका हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. या मोर्चात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पहायला मिळाला.

Breaking News | चांदवडमध्ये दुष्काळाचा आणखी एक बळी

नाशिकच्या चांदवड येथे माहविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर दुष्काळी मोर्चा काढून ठीया आंदोलन करण्यात आले आहे.  यावेळी आमदार शिरीष कोतवाल यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलेले होते. या दुष्काळी मोर्च्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती दिसुन आली. यावेळी चांदवड तालुका दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यात यावा आणि सरकार विरोधी घोषणाही देण्यात आल्या आहेत. विविध मागण्यांसह तहसीलदार यांना निवेदनदेखील यावेळी देण्यात आले.

Crime News | आईचा डोळा लागला आणि १० महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू

चांदवडला तहसील कार्यालयावर मा. आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वखाली माहाविकास आघाडीचा दुष्काळी मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृह, गणुर चौफली येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सोमवार पेठ मार्गे तहसील कार्यालयात हा मोर्चा नेण्यात आलेला होता. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजीदेखील करण्यात आली होती. या मोर्चाला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीतील तालुक्यातील सर्व नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार शिरीष कोतवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, नंदू कोतवाल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सयाजी गायकवाड, नवनाथ आहेर, शिवसेना (उबाठा) गटचे नितीन आहेर, गुड्डू खैरनार, प्रसाद प्रजापात. आदी नेते, तसेच शेतकरी या मोर्च्यात सहभागी झालेले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here