World Cup 2023 | वर्ल्डकपमध्ये होणार भारत-पाकिस्तानचा सेमी-फायनल सामना?

0
33

World Cup 2023 | आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 मधील उपांत्य फेरीची शर्यत खूपच मनोरंजक बनलेली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी उपांत्य फेरीमधील आपले स्थान आधीच पक्के केलेले आहे. तर बांगलादेश आणि गतविजेता इंग्लंड शर्यतीमधून पूर्णपणे बाहेर आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, नेदरलँड आणि अफगाणिस्तान या उर्वरित सहा संघामध्ये दोन जागांसाठी चुरशीची लढत पहायला मिळत आहे.

Nashik News | नाशिकमध्ये निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तूफान राडा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमी फायनलमध्ये काय होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमी फायनलचा सामना होऊ शकतो, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होतो आहे. काल पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला होता, त्यानंतर या चर्चा जास्त रंगलेल्या आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमी फायनलचा सामना होऊ शकतो, फक्त भारत पहिल्या आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर असायला पाहिजे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास भरतीय संघ अव्वल स्थानावर राहील याची खात्री आहे. तर पाकिस्तानी संघ चौथ्या क्रमांकावर राहूनच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो.

मनोज जरांगे पाटील पुन्हा करणार राज्याचा दौरा; जरांगेंचा मेगा प्लॅन आला समोर

उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला प्रथम इंग्लंडचा पराभव करावा लागणार आहे. तसेच, न्यूझीलंड श्रीलंकेकडून हरेल याची प्रार्थना करावी लागेल. यासह अफगाणिस्तानी संघाने आपले उर्वरित दोन सामने गमावलेले आहेत. तरच पाकिस्तानी संघ 10 गुणांसह पात्र ठरू शकेल.

पाकिस्तानचा नेट रन रेट सध्या न्यूझीलंड संघापेक्षा कमी आहे. न्यूझीलंड संघाने श्रीलंकेच्या संघाला मोठ्या फरकाने पराभव केल्यास पाकिस्तानच्या अडचणी वाढू शकतात. उदाहरणार्थ, जर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध 50 धावांनी विजय मिळवला, तर पाकिस्तानला नेट-रन-रेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी इंग्लंडला 180 धावांनी पराभूत करावे लागणार आहे. जर हे समीकरणं जुळले तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 16 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here