Spiritual News | ह्या महिन्यात नक्की करा ‘तुळस पुजन’ असे आहे महत्त्व…

0
41

Spiritual News | कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करणं हे धार्मिक मान्यतेनुसार महत्त्वाचं मानलं जातं. कार्तिक महिना हा २९ऑक्टोबरपासून सुरू झाला असून, ह्या महिन्यात तुळस पुजन केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतात असं म्हटलं जातं.

कार्तिक महिन्यात भगवान विष्णू व लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. जिथे भगवान विष्णु वास करतात, तिथे देवी लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे कार्तिक महिन्यात तुळस पूजन केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते व आरोग्य व आर्थिक लाभ होतो, असं म्हटल जातं. मान्यतेप्रमाणे, कार्तिक महिना हा श्रीविष्णू व देवी लक्ष्मी यांना प्रिय आहे. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीपासून तुळस पूजनाला सुरुवात केली जाते.

Maratha andoln: मराठा आंदोलनावर महाराष्ट्र पेटला, मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ आज जरांगे यांची घेणार भेट

तुळस पूजेचं महत्त्व… 

कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करणं हे फलदायी असतं. असं म्हटलं जातं की, ह्या महिन्यात विधीवत तुळशीची पूजा केल्याने त्या व्यक्तीवर भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा होते. त्यामुळे ह्या महिन्यात रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावं. तसेच ह्या महिन्यात संध्याकाळी तुळशीच्या खाली तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील गरिबी होते.

जीवनातील समस्या दूर करण्यासाठी तसेच  भगवान श्रीविष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज स्नान करून ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून तुळशीला जल अर्पण करावं व तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. तसेच तुळशीची पूजा करताना तुलसी मंत्राचा जपही करावा.

तुळशी मंत्र

शुभम् करोति कल्याणम्, आरोग्यम् धन संपदा, शत्रु बुद्धि विनाशाय, दीपं ज्योति नमोस्तुते।।

कार्तिक महिन्यात तुलसी नामाष्टकाचं पठण तसेच श्रवण केल्यामुळे लाभ द्विगुणित होतो असं मानलं जातं. कार्तिक महिन्यात तुळशीसमोर दिवा लावावा, परंतु काही कारणास्तव दिवा न लावल्यास कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच २७ नोव्हेंबरला ३१ दिवे लावून आपल्या घराच्या कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना करावी. दरम्यान, अंघोळ न करता तुळशीला स्पर्श करू नये.

Gold-Silver Price | सोने- चांदी खरेदीचा हाच ‘गोल्डन चान्स’…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here