मराठा आरक्षाच्या मागणीसाठी उपोषणावर असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली असून, त्यांना प्रचंड अशक्तपणा आलेला आहे. दरम्यान, मनोज जरांगे हे स्टेजवरच कोसळलेआहेत. त्यावेळी त्यांना तिथे असलेल्या दोन जणांनी आधार दिला. अंतरावाली-सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे.
जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी अन्नपाणी सोडलं असून, त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आहे. ते स्टेजवर उभे राहत असतानाच अचानक कोसळले. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित अससेले सर्वच आक्रमक झाले. तिथेच घोषणाबाजी सुरु झाली होती.आंदोलनस्थळी उपस्थित सर्वच मनोज जरांगे यांना पाणी तरी घ्या असे आवाहन करत आहेत. आता काहीच वेळात ते मीडियासोबत बोलणार आहेत अशी माहिती आहे. आज सकाळपासून ते फक्त झोपून आहेत. आणि कालदेखील त्यांनी माइक हातात घेतला तेव्हा त्यांचे हात थरथरत होता.
iPhone13| आयफोनचं स्वप्न पूर्ण होणार; मिळवा iPhone13 फक्त २०,००० रुपयांत…
‘पाणी घ्या, पाटील पाणी घ्या’ असे आवाहन गावकऱ्यांतर्फे केले जात आहे. तिथेच एक मुलगी त्यांच्यासाठी पाण्याची बाटली घेऊन आली होती, पण मनोज जरांगे यांनी पाणी घेतलं नाही. उपचार न घेण्यावरही मनोज जरांगे कायम आहेत. “समाजाच तुम्हाला ऐकावंच लागेल. आज तुम्हाला पाणी घ्यावच लागेल असा आवाज गर्दीतून आला. त्यावर ठिकंय, मी चार-पाच घोट पाणी पीतो” असं मनोज जरांगे म्हणाले.
सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या…
“तुम्ही असा पाणी पिण्याचा हट्ट केला, तर आपल्याला आरक्षण कसं मिळणार? असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले. तुमची माझ्यावरची माया मला कळते आहे. मी पाणी प्यायलो तर लेकराला न्याय कसा मिळेल. मी ह्या समाजाला माय-बाप मानतो हे खरं आहे. ह्या सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या. पण तुम्ही जर असा हट्ट धरलात, तर आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही. जाणुन-बुजून मराठ्यांच्या लेकरावर अन्याय केला जातोय असं मला वाटतंय” असंही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले. शरीरात ताकत नाही अशक्तपणा असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आज झोपूनच उपस्थितांसोबत संवाद साधत आहेत.
आत्ताची मोठी बातमी | मराठा आंदोलनावर सरकारने काढला मोठा तोडगा!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम