political| भाजपला मोठा धक्का..! बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर…

0
29

political| ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला चांगलाच मोठा धक्का बसला आहे. याचे कारण असे कि, भाजप नेते कोमाटिरेडी राजगोपाल रेड्डी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते लवकरच विरोधीपक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या पहिल्या यादीत रेड्डी यांचे नाव नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क करण्यात येत होते. त्यानुसार रेड्डी यांनी बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देट असल्याची घोषणा केली आहे. रेड्डी यांनी २०१८ मध्ये काँग्रेसकडून मुनगोड़ा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला होता. पण, यानंतर मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागीलवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भाजपला सोडचिठ्ठी देताना त्यांनी सांगितले की, “माझ्या कार्यकत्यांच्या इच्छेनुसार मी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.”. तेलंगणा राज्यात येत्या ३० नोव्हेंबर रोजी मतदान सुरु होणार आहे. बीआरएस, कॉंग्रेस तसेच भाजप अशी त्रिकोणी लढत तेलंगणात होत आहे. उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे. निवडणुकीचे निकाल हे ३ डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत.

Onion Market| खरीपाच्या रांगड्या कांदयाची आवक सुरू; किंमतीही वाढणार..?

काँग्रेसची दुसरी यादीही तयार

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी (दि.२५) रोजी झालेल्या बैठकीमध्ये तेलंगणातील दुसऱ्या यादीतील नावांवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्यासह निवडणूक समितीतील सदस्य तसेच तेलंगणामधील प्रमुख नेते उपस्थित होते. ११९ विधानसभा मतदार संघ असलेल्या तेलंगणा राज्यात काँग्रेसने ५५ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here