Onion Rate | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! कांद्याला 6 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळणार

0
8

Onion Rate | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कांद्याचे भाव वाढु लागले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरंतर यंदा सुरुवातीलाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यंदा फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे बाजारभाव अचानक घसरले होते. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये कांद्याला मात्र दोन-तीन रुपये प्रति किलो असा कवडीमोल भाव मिळत होता. विशेष म्हणजे ही परिस्थिती जवळपास जून महिन्यापर्यंत अशीच कायम राहीली होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्थकारण कांदा पिकांवर अवलंबून होते त्यांना लाखों रुपयांचा फटका सहन करावा लागला होता.

Fake Medicine | बनावट औषधं घेताय..तर सावधान! औषध विक्रेत्यांना निर्देश

यावेळी परिस्थिती एवढी बिकट बनली होती की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल एवढे अनुदान शासनाला द्यावे लागलेले आहे. परंतु, जुलै महिन्यापासून कांद्याच्या बाजार भावात थोडीशी वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात कांद्याला चांगला विक्रमी दर मिळू लागला आहे. अशातच शासनाने कांद्याच्या किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच परिणाम म्हणून कांद्याच्या किमती पुन्हा एकदा दबावात आल्या आहेत. आता परंतु पुन्हा एकदा कांद्याचे बाजार भाव हळूहळू वाढू लागलेले आहेत. काल अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर APMC मध्ये कांद्याला तब्बल 5 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. तरी सरासरी बाजारभाव देखील 3 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास नमूद केले जात आहे. अशातच कांदा उत्पादकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर येते आहे.

आगामी काही दिवस कांद्याचे बाजारभाव असेच तेजीत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या उन्हाळी हंगामातील तसेच नवीन खरीप हंगामातील लाल कांदा बाजारात विक्रीसाठी येते आहे. मात्र कमी पावसामुळे खरीप हंगामातील लाल कांद्याचे उत्पादन खूपच कमी झालेले आहे. शिवाय अजून खरीप हंगामातील लाल कांदा पूर्ण क्षमतेने बाजारात येते नाही.

Nashik | देवळ्यातील गिरणारे गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी; आरक्षण मुद्यावर मराठा समाज एकवटला! 

तसेच, उन्हाळी हंगामातील कांदा संपत चाललेला आहे. यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झालेली आहे. तसेच सध्या राज्यात नवरात्र उत्सवाचा सण झालेला आहे. पुढील महिन्यात दिवाळी सणाला सुरुवात होईल. त्यामुळे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आहे.  मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नाही आहे. या गोष्टीचा परिणाम असा झाला आहे की, आता कांद्याचे दर तेजीत आलेले आहेत. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये कांद्याला 6 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव देखील मिळू शकतो असा आशावाद व्यक्त होतो आहे. विशेष म्हणजे यावेळी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल ते 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज जर खरा ठरला तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल तसेच त्यांना चांगली कमाई होईल असा आशावाद व्यक्त होतो आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here