Deola | खालप (ता.देवळा) येथील युवकाचा दसऱ्याच्या दिवशीच विजेचा शॉक लागून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवार (दि.२४) रोजी घडली आहे. तसेच देवळा पोलिसांत अकस्मात् मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे सणासुदीच्या दिवशी एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Big News | दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिंदे गटाच्या तीन बसचा भीषण अपघात; 25 जण जखमी
मूळ गाव खुंटेवाडी आणि सध्या खालप येथे राहत असलेला ‘मोहित दीपक भामरे’ (वय १९) हा देवळा-कळवण रोडवरील मोटार गॅरेजमध्ये कामाला होता. काल दसऱ्यानिमित्त दुपारी एक ते दीडच्या सुमारास साफसफाई आणि फुलांच्या माळा लावण्याचे काम चालू असताना विजेचा शॉक लागून तो खाली पडला. त्यात छातीला मार लागल्याने त्याचे अकस्मात् निधन झाले. पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. याबाबत अधिक तपास देवळा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खांडवे आणि शिंदे आदी करत आहेत. मोहितच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम